आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदगाव खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर तालुक्यातील नांदगाव येथील दत्तात्रेय हरिभाऊ पुंड यांच्या खूनप्रकरणी जिल्हा न्यायाधीश ए. एन. चौरे यांनी सोमवारी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाराजी हरिभाऊ पुंड (७०), अशोक पाराजी पुंड (३३), विक्रम पाराजी पुंड (३५) व गयाबाई विक्रम पुंड (२७) अशी आरोपींची नावे आहेत.
मृत दत्तात्रेय पुंड व आरोपीत सामाईक विहिरीवरून वाद होता. घटनेआधी महिनाभरापूर्वी दोन्ही कुटुंबांत वाद झाला होता. त्यासंबंधी दत्तात्रेय पुंड यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यामुळे आरोपींनी १५ मार्च २०१३ रोजी एकत्र येऊन त्यांच्याशी वाद घातला. विहिरीवरील मोटार बंद करा, असे सांगत आरोपींनी मोटार बांधलेले दावे सोडले.
याबाबत दत्तात्रेय यांनी जाब विचारला असता, आरोपींनी त्यांना विहिरीत ढकलले. त्यांची पत्नी सिंधूबाई व मुलगा मच्छिंद्र यांनाही मारहाण करण्यात आली. सिंधूबाई यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा न्यायाधीश चौधरी यांनी चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा पुरावा व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. रमेश जगताप यांनी काम पाहिले.