आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये नवे उद्योग आणू : राणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगरच्या औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून, येथील उद्योजकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी दिले.

एका लग्नसमारंभासाठी राणे नगरला आले होते. उद्योजकांनी त्यांची एमआयडीसी जिमखाना येथे भेट घेतली. आमी संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, उपाध्यक्ष दौलत शिंदे, सचिव मिलिंद कुलकर्णी, संजय बंदिष्टी, सहसचिव राजेंद्र कटारिया, कारभारी भिंगारे, जयद्र खाकाळ, गोपालकृष्णन, अपूर्व गुजराथी, सुनील कानवडे, समीर पटवर्धन, प्रसाद पटवर्धन, प्रवीण जुंदरे, तसेच एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यावेळी उपस्थित होते. उद्योजकांनी विविध अडचणी राणे यांच्यासमोर मांडल्या.

राणे म्हणाले, नगर एमआयडीसीत नवीन उद्योग यावेत, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. उद्योजकांना जागेची अडचण भासणार नाही, यासाठी आपण विशेष लक्ष देऊ. नगरच्या उद्योजकांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील. माझे नगरकरांशी नाते जोडले गेले आहे. त्यामुळे नगरकरांचे कोणतेही काम थांबणार नाही, याची काळजी घेतली जाईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्योजकांना भेटण्यासाठी वेळ देण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले. नगरच्या उद्योजकांच्या फाईली तातडीने मार्गी लावण्याची सूचना राणे यांनी यावेळी अधिकारी खेडकर यांना केली.

एक रूपयाने वीजदर कमी करण्याचा विचार
काही उद्योजकांनी वाढीव वीजदराबाबत मंत्री राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यावर राणे म्हणाले, उद्योगांचे वीजदर युनिटमागे एक रूपयाने कमी करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.