आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नारायणपूरसाठी धावणार नियमित बस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - श्रीक्षेत्र नारायणपूर दत्तसेवा प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी कोल्हार-घोटी मार्गावरील रास्तारोको आंदोलन व अकोले आगारावरील मोर्चापुढे एस. टी. प्रशासनाने अखेर शरणागती पत्कारत सेवेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. राज्य परिवहन रस्ते महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक पी. ओ. करवंदे यांनी दत्तभक्त व आगारप्रमुख शिवाजी भोईर यांच्यात यशस्वी समन्वय साधला.
अकोले आगाराने दत्तजयंतीसाठी दत्तभक्तांना बस उपलब्ध करून न दिल्याने आगाराचे सुमारे 12 लाखांचे आर्थिक नुकसान झाले. नाशिक आगाराला ते उत्पन्न मिळाले. आगारप्रमुख भोईर यांच्या भूमिकेमुळे दत्तभक्तांना त्रास सहन करावा लागला. भोईर यांनी प्रत्येक पौर्णिमेसाठी नियमित नारायणपूरला धावणारी बसही रद्द केली. यामुळे संतापलेल्या दत्तभक्तांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. त्याची तत्काळ दखल घेत एस. टी चे सहव्यवस्थापकीय संचालक करवंदे यांनी अकोले येथे येऊन दत्तसेवेक-यांच्या भावना समजावून घेत आगारप्रमुख भोईर यांची कानउघाडणी केली. यावेळी आंदोलन थांबवण्याची विनंती दत्तभक्तांना करत सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्या. यामध्ये नारायणपूरसाठी धावणारी बससेवा पूर्ववत सुरू करणे, प्रत्येक पौर्णिमला बस पुरवणे. पुढील दत्तजयंतीस अकोले आगारातूनच बस देण्याबाबत, अकोले आगाराला तांत्रिक कर्मचारी उपलब्ध होताच नादुरुस्त
बसची दुरुस्ती केली जाईल व यापुढे कोणताही आकस न ठेवता सकारात्मक भूमिकेतूनच दत्तभक्तांना सेवा देऊ, अशी कबुली आगारप्रमुख भोईर यांनी यावेळी शेतक-यांना दिली. पोलिस प्रशासनाने दत्तभक्तांना निवडणूक आचारसंहिता व जमावबंदी कायद्याचा धाक दाखवून आंदोलनास परवानगी नाकारली होती. यामुळे मध्यममार्ग म्हणून मागण्या मान्य झाल्याने आंदोलन न करता केवळ महाआरती करून आपल्या भावना प्रशासन व जनतेसमोर मांडण्याचे काम दत्तभक्तांनी केले. दत्त बनकर, दिलीप शेजवळ यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. भाऊसाहेब आंधळे यांनी आभार मानले.
दत्तभक्तांनी बुकिंग नाकारले - दत्तजयंतीसाठी बस देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी दत्तसेवेकरी प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांनी केली होती. स्वाध्याय परिवाराला ज्याप्रमाणे बुकिंग करून आम्ही बस पुरवतो. तसेच बुकिंग करण्याचा आम्ही सल्ला दिला. मात्र, दत्तभक्तांनी तो नाकारल्याने इतर प्रवाशांची गैरसोय नको, म्हणून बस देण्यास नकार दिला होता. - शिवाजी भोईर, अकोले, आगारप्रमुख.