आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर - भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडले आहे. पण मोदींना पक्षातूनच अंतर्गत विरोध आहे, असे हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हिंदूराष्ट्र सेना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी देसाई सध्या नगर जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. नगरमध्ये संघटनवाढीसाठी त्यांनी दिगंबर गेंट्याल यांच्यावर जिल्हा प्रमुख म्हणून धुरा सोपवली आहे. यानिमित्त मंगळवारी खाकीदासबाबा मठात आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते.
हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करणार्या सर्व राजकीय पक्षांनी निराशा केल्याने केवळ हिंदू हिताचा मुद्दा घेऊन आम्ही निघालो आहोत. भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला आहे. एकटे मोदी चांगले असले, तरी पक्षातील इतर सर्वजण चांगले आहेत असे म्हणता येणार नाही. मोदींना त्यांच्याच पक्षाचा अंतर्गत विरोध आहे हे विसरून चालणार नाही, असे देसाई यांनी सांगितले.
हिंदू धर्म आणि साधू-संतांविरुद्ध देशात सध्या कटकारस्थाने केली जात आहेत, असा आरोप करून देसाई म्हणाले, आसारामबापू यांच्यावरील कारवाई अशाच कटाचा भाग आहे. ‘जो हिंदू हित का काज करेगा, वह ही देशपर राज करेगा’ हे ब्रीद ठेवून राष्ट्रसेना कार्य करत आहे. कोणत्याही धर्म किंवा अल्पसंख्याकांच्या नावाखाली आरक्षण देणे घटनाबाह्य आहे, असे देसाई म्हणाले.
2014 च्या निवडणुका रंगीत तालीम
हिंदू राष्ट्रसेना राजकीय उत्थानासाठी 2014 लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. त्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याकरिता तातडीने तालुकानिहाय समित्या गठित करण्यात येणार आहेत. आमचे लक्ष्य 2019 असले, पण 2014 च्या निवडणुका आमच्यासाठी रंगीत तालीम आहे. नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर आम्ही उमेदवार देण्याच्या तयारीत आहोत, असे देसाई यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.