आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Election Rally, Lok Sabha Election

मोदींच्या सभेची जय्यत तयारी, 5 लाखांची गर्दी जमवण्याचे लक्ष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा शनिवारी (12 एप्रिल) नगरला होणार आहे. भाजपने या सभेची जय्यत तयारी केली आहे. सभेसाठी जिल्हाभरातून 5 लाख लोक येतील, असा दावा शहर उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी मंगळवारी केला.


नगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारासाठी मोदी प्रथमच नगरला येत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांची सभा होणार होती. मात्र, ती काही कारणांमुळे होऊ शकली नाही. आता मात्र तो योग जुळून आला आहे. शनिवारी सावेडीतील निरंकारी भवनाजवळील मैदानात दुपारी तीन वाजता ही सभा होणार आहे. या सभेस खासदार गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते विनोद तावडे व एकनाथ खडसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हाभरातून सुमारे पाच लाख लोक या सभेस आणण्याचे नियोजन आहे. सभेची तयारी सुरू असून, येत्या दोन दिवसांत ती पूर्ण होईल, असे गट्टाणी यांनी सांगितले.


जिल्हा विशेष शाखेकडे अजून मोदींचा अधिकृत दौरा नाही
नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या बंदोबस्ताचे नियोजन करणार्‍या जिल्हा विशेष शाखेकडे मोदी यांचा अधिकृत दौराच अजून आलेला नाही. सोमवारी (7 एप्रिल) रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी सभास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मात्र, बंदोबस्ताचे नियोजन अजून सुरू झालेले नाही.