आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Party's Local Member Registration Issue At Nagar

नरेंद्र मोदी आर्मी एक लाख सदस्य नोंदणी करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी नरेंद्र मोदी आर्मी संघटना शहरात कामाला लागली आहे. युवकांची मोठय़ा संख्येने नोंदणी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 20 हजार सदस्यांची नोंदणी झाली आहे. एक लाख सदस्य नोंदणी होईपर्यंत काम सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेचे शहराध्यक्ष गोपाल वर्मा यांनी सांगितले.

दिल्ली गेट परिसरात संघटनेच्या सदस्य नोंदणी उपक्रमात वर्मा बोलत होते. ते म्हणाले, मोदी यांनी गुजरातचा कायापालट केला आहे. आता देशाचा कायापालट करण्यासाठी त्यांना पंतप्रधान करायचे आहे. मोदी यांचे विचार तरुण पिढीला पटले आहेत. सर्वसामान्यांपर्यंत हे विचार पोहोचवण्याचे काम नरेंद्र मोदी संघटना करत आहे.

काँग्रेस आघाडीने आतापर्यंत युवकांचा केवळ मतांपुरता वापर करून घेतला. त्यामुळेच अनेक युवक अजून बेरोजगार आहेत. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मोदी पंतप्रधान झाले, तरच सुटणार आहे. महागाई व भ्रष्टाचाराने सामान्य माणूस वैतागला आहे. महागाई कमी करायची असेल, भ्रष्टाचारमुक्त भारत करायचा असेल, तर मोदी यांना पंतप्रधान करण्यास मदत करा. सध्या देशातील युवकांसह सर्वच क्षेत्रातून मोदी यांना मिळणारा पाठिंबा लक्षात घेत आगामी निवडणुकीत चांगले यश मिळून तेच पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा विश्वासही वर्मा यांनी व्यक्त केला.

नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात रविवारी नरेंद्र मोदी आर्मी संघटनेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली. या वेळी विद्यार्थ्यांसह मोठय़ा संख्येने नागरिकांनी सदस्य नोंदणी करवून घेतली असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.