आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथविधीनिमित्त उद्या मोफत चहा..!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नरेंद्र मोदी सोमवारी (26 मे) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नगर येथील हॉटेल गुरुप्रसादचे चालक विश्वास चौधरी हे हा आनंद चहाचे मोफत वाटप करून साजरा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते. निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी मोदींना ‘चहावाला’ म्हणत हिणवले होते. मात्र, मोदी यांनी या टीकेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत ‘चहावालाच देशाचा पंतप्रधान होईल’, असे ठणकावून सांगितले होते. त्यामुळे देशभरातील लाखो चहाविक्रेत्यांसाठी ही अभिमानाची बाब ठरली.

निवडणूक कालावधीत अनेकांनी ‘नमो टी स्टॉल’ या नावाने चहाची विक्री केली. निवडणुकीत भाजपसह एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे मोदीच पंतप्रधान होणार, हे निश्चित झाले. 26 मे रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगर येथील हॉटेल गुरुप्रसादचे चालक विश्वास चौधरी सायंकाळी चार ते सात या वेळात ‘मोदी चहा’चे मोफत वाटप करणार आहेत. मोदी पंतप्रधान झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हा अभिनव उपक्रम करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.