आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नासा’चा विज्ञान प्रकल्प आता नगर शहरामध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विज्ञानविश्वात अग्रगण्य असलेल्या अमेरिकेच्या ‘नासा’संस्थेने विकसित केलेले वैज्ञानिक प्रकल्प नगरमध्ये राबवले जाणार आहेत. येथील भव्य एज्युकेशन संस्था कॅनडामधील मॅड सायन्स संस्थेच्या सहकार्याने दुसरी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण प्रकल्प ऑगस्ट महिन्यापासून नगरमध्ये सुरू करणार आहे. पुणे, मुंबई, बंगळुरूनंतर थेट नगर शहरात हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचे भव्य एज्युकेशनचे संचालक अशोक सचदेव यांनी सांगितले.

मॅड सायन्सद्वारे जगभरातील 20 देशांमध्ये विज्ञानाचे मनोरंजक व प्रबोधनात्मक शिक्षण प्रकल्प सुरू आहेत. याच पन्नास लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, पर्यावरणशास्त्र, खगोलशास्त्र व तंत्रज्ञान यावर भर दिला जातो. ‘नासा अँकॅडमी ऑफ फ्युचर स्पेस एक्सप्लोजर यांच्याशी संलग्न असलेल्या ‘मॅड सायन्स’ने दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘युरेका : द यंग सायंटिस्ट अँण्ड टॅलेंट सर्च प्रोग्राम’ राबवला आहे.

एक ऑगस्टपासून नगरमध्ये भव्य एज्युकेशनच्या माध्यमातून युरेका शैक्षणिक प्रकल्प नगरमध्ये उपलब्ध होणार आहे. पुण्यातील ‘मिशन अपोलो’ संस्थेने मॅड सायन्सशी करार केला असून भारत व र्शीलंकेत ते शैक्षणिक प्रकल्प राबवतात. नगरमधील प्रकल्पातही ते सहभागी आहेत. विज्ञाननिष्ठ पिढी घडवण्याच्या उद्देशाने नगर शहरातील व जिल्ह्यातील विविध शाळांच्या मदतीने हा प्रकल्प राबवला जाणार आहे, असे सचदेव यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पाविषयी अधिक माहिती देताना मिशन अपोलोचे व्यवस्थापकीय संचालक संदीप जोशी म्हणाले, की विज्ञानाबाबत चाकोरीबाहेरील विचारसरणी भावी पिढीत रुजवण्याचे ध्येय असलेल्या मॅड सायन्सने विज्ञानाच्या संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांनी समजून सांगणे महत्त्वाचे मानले आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीमुळे स्पर्धायुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही ती दाखवण्यात अडचणी येतात. मुलांना विज्ञानावर प्रेम करायला शिकवण्याबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी मानसिकदृष्ट्या तयार करणे मॅड सायन्सने महत्त्वाचे मानले आहे. त्यामुळे तरुण वयात मुलांना शिक्षणात व नंतरच्या करिअरमध्ये सायन्स ऑफ फॉरेन्सिक अँण्ड सिक्युरिटी सारख्या अनेक संधी व पर्याय खुले होतात.

मॅड सायन्सच्या सई नायर यांनीही या कार्यक्रमाची माहिती दिली. भव्य एज्युकेशनच्या लर्निंर्ंग सेंटरमध्ये (हॉटेल ओबेरॉयमागे, प्रजापिता ब्रrाकुमारीजवळ, सावेडी) एक ऑगस्टपासून रोज सायंकाळी चार ते सहा या दरम्यान शिक्षण दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी अशोक सचदेव (दूरध्वनी : 9657777755) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या पत्रकार परिषदेला हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीत अडीच कोटींची स्कॉलरशिप मिळालेल्या ब्राझिलच्या तबाता डेपोन्टस् ही विद्यार्थिनीही उपस्थित होती. सध्या ती ‘मिशन अपोलो’च्या मदतीने भारतीय शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात आली आहे. तिने भारत व ब्राझिलमधील शिक्षणव्यवस्थेत फारसा फरक नसल्याचे निरीक्षण नोंदवले. तबाताने सायन्स ऑलिम्पियाडमध्ये तीन सुवर्ण तसेच रजत पदके मिळवली आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना मिशन ऑलिम्पियाडसाठी प्रेरणा देण्याचे काम ती करीत आहे.

‘भव्य एज्युकेशन’चा सतत नावीन्याचा ध्यास

सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी नगरमध्ये स्थापन झालेल्या भव्य एज्युकेशन संस्थेने पारंपरिक शिक्षण पद्धतीला छेद देणारे शैक्षणिक प्रकल्प नगरमध्ये राबवले आहेत. बचपन प्ले स्कूलद्वारे पाच वर्षांच्या आतील मुलांना शारीरिक व मानसिक सक्षमतेचे मार्गदर्शन दिले आहे. मुलांमधील उपजत ज्ञानग्रहणाच्या शक्तीला चालना देऊन बालवयातच त्यांचे व्यक्तिमत्त्व बहरावे, त्यांच्यात संभाषण कौशल्य व सभाधीटपणा रुजवावा, खेळातून त्यांचे आरोग्य राखले जावे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आता मॅड सायन्सच्या सहकार्याने दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ करण्याचे ध्येय भव्य एज्युकेशनने बाळगले आहे.