आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक पालिकेतील सत्ताधारीच आंदोलनाच्या पवित्र्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्या कामकाजाकडे बोट दाखवत लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी मनसेची पिसे काढल्यानंतर आता मनसेही आक्रमक झाली आहे. आमदार वसंत गिते व महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी नगरसेवकांनी आयुक्तांची शुक्रवारी भेट घेत प्रलंबित कामांचा पाढा वाचला. सत्तेत असलो तरी नागरी हितांच्या कामासाठी वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा या वेळी आमदार गिते यांनी आयुक्तांना दिला.दरम्यान, पावसाळी नाल्यांची सफाई, झोपडपट्टी परिसरातील गटारींची सफाई आदी कामे तातडीने हाती घेण्याची ग्वाही या वेळी आयुक्त संजीवकुमार यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत मनसेच्या कामकाजाचा काँग्रेस, रावादी आघाडीसह शिवसेनेने सडकून समाचार घेतला होता. त्यामुळे मनसेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. याबाबत मनसेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच शहराचा विकास होऊ शकला नसल्याचा दावा आता मनसेच्या पदाधिकाºयांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व सत्ताधारी नगरसेवकांनी आयुक्तांकडे गाºहाणे मांडले. शिष्टमंडळात महापौर, आमदारांसह शहराध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले, सभागृहनेते शशिकांत जाधव, गटनेते अशोक सातभाई, प्रकाश दायमा व मनसेच्या नगरसेवकांचा समावेश होता.

गंगापूररोड रुंदीकरणाबाबत तत्काळ निर्णय घ्या

गंगापूररोडवरील जेहान सर्कल ते सोमेश्वरपर्यंत रस्ता रुंदीकरण सुरू झाले. परंतु, पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतल्याने रस्त्यात येणारी झाडे तोडण्यास तूर्त मनाई असल्याने हे काम थांबविले आहे. संबंधित झाडांची मुळे उघडी पडली असून, पावसाळ्यात ही झाडे कोसळू शकतात. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला तातडीने प्रारंभ करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

स्थिर सरकारप्रमाणे स्थिर आयुक्त द्या

केंद्रात स्थिर सरकार आले आहे, आता पालिकेत स्थिर आयुक्त द्यावा, अशी मागणी आमदार वसंत गिते यांनी केली. संजीवकुमार यांना जरी पालिकेचा पूर्णवेळ कारभार दिला तरी चालेल; परंतु आयुक्तांची वारंवार उचलबांगडी करू नये, असेही गिते यांनी सांगितले.

आगामी महासभेत मनसेचा राडा

महापालिकेत मनसे-भाजपची सत्ता असली तरी प्रशासनाची सत्ताधाºयांना साथ मिळत नसल्याचा दावा करत सत्तेत असलो तरी यापुढे विकासासाठी आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब केला जाईल, असे सांगत आगामी महासभेत प्रशासनाला उघडे पाडण्याचा इशारा गिते यांनी दिला.