आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडर ऑफिसर शिवानी पारखेची श्रीलंका दौ-यासाठी निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर कॉलेजच्या राष्ट्रीय छात्र सेनेची अंडर ऑफिसर शिवानी पारखे हिची युवक आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत श्रीलंका दौ-यासाठी निवड झाली आहे.
शिवानीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित राजपथ संचलन, समूह नृत्य, बॅले, ड्रील यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. राज्याला मिळालेला पंतप्रधान बॅनर स्वीकारण्यासाठीही तिची निवड करण्यात आली होती. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर तिची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे. याबद्दल प्राचार्य रजनिश बार्नबस यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.