आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरित लवादाकडून मनपा आयुक्तांना २० हजारांचा दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बुरूड गावकचरा डेपोप्रकरणी दाखल याचिकेवर १३ आॅगस्टला झालेल्या सुनावणीत राष्ट्रीय हरित लवादाने महापालिका आयुक्त विलास ढगे यांची चांगलीच कानउघाडणी केली. एवढेच नाही तर वकिलांमार्फत अर्धवट चुकीची माहिती दिल्याप्रकरणी लवादाने ढगे यांना २० हजारांचा दंड ठोठावला. याप्रकरणी ढगे यांनी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे प्रकल्प अभियंता आर. जी. मेहेत्रे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शहरातील कचरा कोणतीही प्रक्रिया करता बुरूडगाव येथील कचरा डेपोत टाकण्यात येतो. त्यामुळे परिसरातील शेती नापीक झाली आहे. याप्रकरणी बुरूडगावचे ग्रामस्थ जनार्दन कुलट, राधाकिसन कुलट भाऊसाहेब कुलट यांनी हरित लवादाकडे दाद मागितली आहे. लवादाने वेळोवेळी महापालिका प्रशासनाला जाब विचारला, कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी मुदतही दिली. परंतु निर्ढावलेले प्रशासन स्थायी समिती सदस्यांनी लवादाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे लवादाने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपवली.
प्रकल्प उभारण्यासाठी लागणारा चार कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्याचे आदेशही लवादाने मनपा प्रशासनाला दिले. त्यानुसार मनपाने जिल्हा प्रशासनाकडे चार कोटींचा निधी जमा केला.

जिल्हा प्रशासनाने कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी निविदाही मागवल्या. त्यानंतरच्या कार्यवाहीची जबाबदारी मनपा प्रशासनाची होती. परंतु त्याकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. याप्रकरणी ३० जुलैला लवादाची सुनावणी झाली. त्यात मनपाने पंधरा दिवसांत सविस्तर अहवाल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आश्वासन लवादाला दिले होते. मात्र, १३ ऑगस्टला झालेल्या सुनावणीत मनपाने कोणताही अहवाल प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. त्यामुळे लवादाने आयुक्त ढगे यांची चांगलीच कानउघाडणी केली. अहवाल प्रतिज्ञापत्र का सादर केले नाही, असा जाब लवादाने आयुक्त ढगे यांना विचारला. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत काहीच सांगितले नसल्याचे ढगे यांनी स्पष्ट केले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली का, अशी विचारणा लवादाने केली. शिवाय आपल्या वकिलांमार्फत अहवाल प्रतिज्ञापत्र सादर करण्याची आवश्यकता नसल्याची अर्धवट चुकीची माहिती लवादापुढे सादर केल्याचा ठपका आयुक्तांवर ठेवण्यात आला. याप्रकरणी लवादाने ढगे यांना २० हजारांचा दंड ठोठावला. त्यामुळे ढगे यांनी यास जबाबदार असलेले अतिरिक्त अायुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे प्रकल्प अभियंता आर. जी. सातपुते यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले आहेत.
प्रकल्पाचे काम सुरू
बुरूडगाव कचरा डेपोत ५० मेट्रिक टन क्षमतेचा मेकॅनिकल कंपोस्टींग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. येत्या महिनाभरात हा प्रकल्प सुरू होईल. पुणे येथील पी. एस. जाधव या ठेकेदार संस्थेला हे काम देण्यात आले आहे. याशिवाय सावेडी उपनगरात एक मेट्रिक टन क्षमतेचा बॅक्शन पायलट प्रकल्प वारूळाचा मारूती परिसरात दोन मेट्रिक टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.

लवादाची दिशाभूल
प्रकल्प सुरू करण्यात आला, परंतु हा प्रकल्प एखाद्या खडीक्रशरसारखाच आहे. त्यात केवळ कचरा बारीक करण्याचे काम होईल. नवीन कचऱ्याचा प्रश्न मात्र कायम आहे. त्यामुळे आमची लढाई शेवटपर्यंत सुरू ठेवणार आहोत.'' जनार्दन कुलट, याचिकाकर्ते.