आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये फेब्रुवारीपासून राष्ट्रीय युवा एकात्मता शिबिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - युवानसंस्था राष्ट्रीय युवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने समविचारी संस्थांच्या सहयोगातून ते फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय युवा एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शेजारच्या राष्ट्रांतील युवकही सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक डॉ. एस. एन. सुब्बाराव हे जगभरात अशा शिबिरांचे आयोजन करतात.
राष्ट्रनिर्माणात युवकांचा सक्रिय सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून निवडक ५०० युवा या शिबिरात सहभागी होणार आहेत. देशातील विविध राज्यांसह श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, इंडोनेशिया आदी देशांतील युवकांचा यात समावेश असेल. युवकांमध्ये सामूहिक शिस्त, श्रमसंस्कार, भेदभाव विरहित मानवीय दृष्टिकोन रुजवून त्यांचा राष्ट्रनिर्माणातील सहभाग वाढवण्यावर शिबिरात भर देण्यात येतो.
शिबिराच्या आयोजनासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत डॉ. सुब्बाराव यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जात-पात, प्रांत, भाषा, धर्म आदी भेदभावांमुळे देश पोखरला गेला आहे. रचनात्मक कार्यक्रमातून एकसंघपणा वाढवला, तरच भारत महासत्ता बनू शकेल. देशभरातून शेजारील राष्ट्रांतून येणाऱ्या युवकांच्या व्यवस्थेसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी देणगीदारांबरोबरच आपला वेळ, ज्ञान, कौशल्य देऊ शकणाऱ्या स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. पाहुणे या नात्याने शिबिरार्थींना एक दिवस नगरमधील विविध कुटुंबांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बैठकीला रोटरी प्रियदर्शिनीच्या अध्यक्ष डाॅ. स्नेहल कुलकर्णी, जागृती ओबेराय, प्रतिभा धूत, अशोक पितळे, प्रसाद जोशी, डॉ. सैद काझी, डॉ. सुधा कांकरिया, सुरेश मैड, किशोर मुनोत, स्नेहालयाचे सुवालाल शिंगवी आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय युवा एकात्मता शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. सुब्बाराव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदरातिथ्य करण्याची संधी
शिबिराच्यानिमित्ताने शिबिरार्थीचे आदरातिथ्य करण्याची संधी नगरकरांना मिळणार आहे. देश-विदेशांतील ५०० शिबिरार्थींचे या निमित्ताने नगरशीही नाते जोडले जाणार असल्याचे डॉ. सुब्बाराव यांनी सांगितले. या उपक्रमाविषयी अधिक माहिती सहभागासाठी युवानचे संस्थापक संदीप कुसाळकर यांच्याशी (९०११११८७८७) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.