आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Pulse Polio News In Marathi, Divya Marathi

46 हजार बालकांना आज पोलिओ डोस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा दुसरा डोस रविवारी (23 फेब्रुवारी) देण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरातील 45 हजार 999 बालकांना डोस पाजण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. 19 जानेवारीला राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत शहरातील 44 हजार 796 बालकांना पहिला डोस देण्यात आला होता, अशी माहिती मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिली.या लसीकरण मोहिमेसाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. शहरात शून्य ते पाच वष्रे वयोगटातील 45 हजार 999 बालकांना दुसरा डोस पाजण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी मनपा हद्दीत 178 पोलिओ बुथ, 22 ट्रान्झिट टीम, फिरते पथक व 625 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. शासनाकडून या मोहिमेसाठी 60 हजार पोलिओ डोसचा पुरवठा करण्यात येणार आहे. 23 फेब्रुवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत जवळच्या लसीकरण केंद्रावर डोस उपलब्ध राहणार आहे. बाळ आजारी असले, नवजात असले, तरी सर्व पालकांनी आपल्या बाळाला डोस पाजून घ्यावा, असे आवाहन महापौर संग्राम जगताप व आयुक्त विजय कुलकर्णी यांनी केले आहे.

मोहिमेला सहकार्य करा : जिल्हाधिकारी
जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची प्रभावी जनजागृती करून या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले. पोलिओ जिल्हा कृतिदल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. 0 ते 5 वर्षे वयोगटातील 4 लाख 55 हजार 524 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. त्यात ग्रामीण भागात 3 लाख 56 हजार 749 व शहरी भागात 54 हजार 846 बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे.