आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National Short Film And Documentary Film Festival At Ahmednagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगरात शनिवारपासून राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- न्यू आर्टस् कॉर्मस अँण्ड सायन्स महाविद्यालयातील संज्ञापन अभ्यास विभागातर्फे चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार (16 फेब्रुवारी) पासून ‘प्रतिबिंब राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील गाजलेले लघुपट व माहितीपट पाहण्याची मेजवानी या तीन दिवसांच्या महोत्सवामुळे रसिकांना मिळणार आहे.

स्टेशन रोडवरील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेता लघुपट दिग्दर्शक नागराज मंजुळे व प्रसिद्ध निर्माता नीलेश नवलखा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सहसचिव अँड. दीपलक्ष्मी म्हसे उपस्थित असतील, अशी माहिती प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांनी दिली आहे.

‘न्यू आर्टस्’ महाविद्यालयात 6 वर्षांपूर्वी संज्ञापन अभ्यास विभागाची स्थापना झाली. त्यानंतर 2008 मध्ये राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यंदा या महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. त्यामध्ये शनिवारी व रविवारी (16 व 17 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही दुर्मिळ चित्रपट व माहितीपट दाखवण्यात येणार आहेत, तर सोमवारी (18 फेब्रुवारी) देशभरातून आलेले लघुपट व माहितीपट दाखवले जाणार आहेत. सोमवारी सायंकाळी आयोजित समारंभात चित्रपट दिग्दर्शक व अभ्यासक गायत्री चटर्जी व चित्रपट पटकथा लेखक शैलेश दुपारे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. हा महोत्सव नगरकरांसाठी मोफत असून महोत्सवाच्या प्रवेशिका महाविद्यालयाच्या संज्ञापन अभ्यास विभागात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

हे दुर्मिळ चित्रपट पाहण्याची संधी
‘प्रतिबिंब’ महोत्सवात शनिवारी व रविवारी ‘बोल’, ‘पथेर पांचाली’, ‘भूमिका’, ‘ओसामा’, ‘द कप’, ‘पोस्टमन इन द माऊंटन्स’, ‘आम्ही असू लाडके’, ‘टू सर विथ लव्ह’ हे चित्रपट, तर ‘इंडिया अनटच्ड’ हा माहितीपट दाखवला जाईल, तर सोमवारी सकाळच्या सत्रात स्पर्धेत सहभागी झालेले आणि दुपारच्या सत्रात गाजलेले निवडक लघुपट व माहितीपट दाखवले जाणार आहेत.’’ बापू चंदनशिवे, विभागप्रमुख, संज्ञापन अभ्यास विभाग.