आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Conclave In July At Kopergaon

कोपरगावात जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केंद्र राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. साखरेला भाव नाही उठावही नाही. त्यामुळे ऊसउत्पादकांची देणी देण्यासाठी कारखान्यांकडे पैसा नाही. दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. शेतमाल, कापूस, फळबागा, दूध यांच्या दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वत्र निराशेचे वातावरण आहे. कोण सुखी आहे, हेच कळत नाही, अशी खंत माजी आमदार अशोक काळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. शेती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जुलै रोजी कोपरगावातील एसएसजीएमच्या मैदानावर राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

काळे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना जिल्ह्यातील कॉंग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात मधुकर पिचड यांच्यावर जोरदार टीका केली. गेले वर्षभर नगर नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाणी जायकवाडीत सोडण्यावरून वादंग उठले. या प्रकरणात काळे यांनी न्यायालयीन लढाई केल्यानेच जायकवाडीत जास्त पाणी जाण्यात अडथळा निर्माण झाला. आताही या विषयावर दहा याचिका दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी विखे, थोरात पिचड यांच्यावर टीकास्र सोडताना काळे म्हणाले, या तिन्ही माजी मंत्र्यांनी जिल्ह्याची फिकीर केली नाही. जिल्हा राजकीयदृष्ट्या प्रभावहीन झाला आहे. पुढारी ढिले पडले आहेत. मराठवाड्यातील मतांवर डोळा असल्यानेच या नेत्यांनी जिल्ह्याच्या हिताचा बळी दिला. मी मात्र थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिल्याने जिल्ह्याचे पाणी वाचले. औरंगाबाद न्यायालयात आपल्याला न्याय मिळाला नसता. कारण तेथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मराठवाड्यातीलच होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात गेलो न्याय मिळाला, असे ते म्हणाले.

मध्यंतरी राज्यातून गुजरातला २० टीएमसी पाणी देण्याची चर्चा सुरू झाली. त्यावर टीका करताना काळे म्हणाले, गुजरातला पाणी देण्यास ती काय त्यांची खासगी मालमत्ता आहे? मी असे करणाऱ्यांना न्यायालयात खेचीन. मी जी न्यायालयीन लढाई लढत आहे, ती योग्य असल्याचे पवार यांनी सांगितल्याचेही काळे यांनी यावेळी नमूद केले.

वाळूतस्करीतून थेट महसूलमंत्र्यांना ‘लाभ’
जिल्ह्यातवाळूतस्करांचा प्रश्न मोठा आहे. सर्वच महसूलमंत्र्यांना या तस्करीतून वाटा मिळत असल्याने ही तस्करी सुरू असल्याचा थेट आरोप काळे यांनी केला. अधिकारी ठेकेदार यांचे संगनमत असल्यानेच ही तस्करी राजरोसपणे सुरू असल्याचे ते म्हणाले.

मेळाव्याला जमणार १५ हजार कार्यकर्ते
कोपरगावच्यामेळाव्याला पक्षाचे प्रमुख नेते जिल्हाभरातून १५ कार्यकर्ते जमणार आहेत. या संदर्भात नगरमध्ये पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. या मेळाव्यात पक्ष सोडून गेलेले परत येण्याची शक्यता आहे. संघटना बांधणीसाठीही हा मेळावा होणार असल्याची माहिती युवा नेते आशुतोष काळे यांनी दिली.