आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिष्ठेच्या लढतीत गाडेंचा योगि 'राज', राष्ट्रवादीच्या शोभा बोरकर यांचा ७०५ मतांनी पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या प्रभाग ११ मधील प्रतिष्ठेच्या लढतीत अखेर शिवसेनेचे योगिराज गाडे यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार शोभा बोरकर यांचा तब्बल ७०५ मतांनी पराभव केला. प्रभाग १५ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार भारती भोसले यांनी काँग्रेसच्या शीला चव्हाण यांचा ६४७ मतांनी पराभव केला. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरले होते. प्रभाग ११ मध्ये शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत होती. राष्ट्रवादीचा पराभव करत शिवसेनेने या जागेवर दणदणीत विजय मिळवला.

नगरसेवक अजिंक्य बाेरकर अनिता भोसले यांची पदे रद्द झाल्याने दोन्ही जागांसाठी १० जानेवारीला निवडणूक झाली. प्रभाग ११ मध्ये हजार ४८७, तर प्रभाग १५ मध्ये हजार ६८७ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग ११ चे शिवसेना उमेदवार योगिराज गाडे यांनी हजार ४५१ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. प्रभाग १५ मधील राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार भारती भोसले यांना हजार ४११ मते मिळाली.

दोन्ही जागांसाठी तब्बल बारा उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सात उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. प्रभाग ११ मध्ये गाडे बोरकर यांच्यात थेट लढत झाली, तर प्रभाग १५ मध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस भाजपच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होती. निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र बेहेरे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी जुन्या महापालिका कार्यालयात मतमोजणी झाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
बातम्या आणखी आहेत...