आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Defeated Shiv Sena In Mukundnagar By Election

राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा दारुण पराभव, मुकुंदनगर पोटनिवडणुकीत झिनत शेख विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणूक अधिकारी भालचंद्र बेहेरे यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारताना राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार झिनत शेख. समवेत सहायक निवडणूक अधिकारी एस. बी. तडवी. - Divya Marathi
निवडणूक अधिकारी भालचंद्र बेहेरे यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारताना राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार झिनत शेख. समवेत सहायक निवडणूक अधिकारी एस. बी. तडवी.
नगर - मुकुंदनगर मधीलप्रभाग १० "अ' च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार झिनत शेख यांनी शिवसेनेच्या निता काकडे यांचा १३४१ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत ४९.३० टक्के मतदान झाले होते. चार अपक्षांसह सहा उमेदवार रिंगणात होते. त्यातील अनेकांची अनामत रक्कम जप्त झाली.

प्रभाग क्रमांक १० मधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका विजया दिघे यांच्या निधनामुळे या प्रभागात पोटनिवडणूक झाली. राष्ट्रवादीच्या उमेदवार झिनत शेख, शिवसेनेच्या निता काकडे, अपक्ष चित्राबाई डापसे, दीपाली देशमुख, सुवर्णा लहामगे, तहसीन शेख हे उमेदवार रिंगणात होते. खरी लढत राष्ट्रवादी शिवसेनेमध्येच होती. या लढतीत राष्ट्रवादीने एकहाती विजय मिळवत शिवसेनेचा दारुण पराभव केला. शिवसेनेच्या उमेदवार काकडे यांना अवघे ७८३ मते मिळाली. निवडणुकीत ७३१२ पैकी ३६०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जुन्या महापालिका कार्यालयात मंगळवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. अवघ्या पाऊण तासात मतमोजणी पूर्ण होऊन निवडणूक अधिकारी भालचंद्र बेहेरे यांनी शेख यांना विजयी घोषित केले. शेख यांच्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रचारफेरी काढली होती. शिवसेनेने मात्र होम टू होम प्रचारावर भर दिला. पाऊस सुरू असल्याने मतदार घराबाहेर पडल्याने अवघे ४९. ३० टक्के मतदान झाले होते. महापौर निवडणुकीमुळे या निवडणुकीच्या प्रचारात फारशी रंगत आली नाही. राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिघे यांच्या निधनामुळे पुन्हा राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येणार का, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर राष्ट्रवादीने आपला गड राखण्यात यश मिळवले.

शिवसेनेला पुन्हा अपयश
महापौरनिवडणुकीत राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे करूनही शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला. पोटनिवडणुकीत देखील शिवसेनेला दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. पोटनिवडणुकीतील दारुण पराभवामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या.

उमेदवारनिहाय मते
झिनत सलिम शेख (राष्ट्रवादी २१२४)
निता भाऊसाहेब काकडे (शिवसेना ७८३)
तहेसिन निसार शेख (अपक्ष ३६३)
दीपाली श्रीकांत देशमुख (अपक्ष १६३)
चित्राबाई सुनील डापसे (अपक्ष १९)
सुवर्णा आनंद लहामगे (अपक्ष १२१)