आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress March On Jamkhed Tahasil Office

जामखेड तहसीलवर 'राष्ट्रवादी'चा मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड - सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून पाणी चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकार उपाययोजना करण्याऐवजी जाहीर केलेल्या मदतीचे डिजिटल फलक लावून जाहिरात करण्यात करोडो रुपयांची उधळण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केला आहे. ते जामखेड तहसीलवर काढलेल्या माेर्चात बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दुष्काळ अन्य विविध प्रश्री जामखेड तहसील कार्यालयावर माजी मंत्री पिचड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री सुरेश धस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, तालुकाध्यक्ष नगरसेवक राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, संजय वराट, गुलशन अंधारे, संदीप गायकवाड, विकास राळेभात, फिरोज कुरेशी, गणेश आजबे, निखिल घायतडक, राजेश वाव्हळ, उमर कुरेशी, सखाराम भोरे, प्रदीप पाटील, प्रकाश काळे, मनोज भोरे, मोहन पवार, राजेंद्र गोरे, नरेंद्र जाधव, हानिफ कुरेशी, संभाजी कदम, शेरखान पठाण, अकबर शेख यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

यावेळी सुरेश धस यांनी राज्य सरकारवर टीका करताना सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसून भलतेच मुद्दे उकरून काढून नौटंकीबाजी करण्यात सरकार व्यस्त आहे. प्रशासनाला भलतीकडेच गुंतवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी फडणवीस सरकारवर केला. जामखेड तालुक्यातील सर्व पशुधन शेजारील तालुक्यातील छावण्यात गेले, तरी पालकमंत्री गंभीर होत नाही. जामखेड तालुक्याला टंचाईच्या काळात शेवटपर्यंत वंचित रहावे लागले. एवढ्या मोठ्या तालुक्याला केवळ चार छावण्या चालू करण्याची मंजुरी ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे धस यांनी सांगितले. पालकमंत्री मोठा निधी आणल्याच्या नुसत्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तालुक्यातील भीषण पाणी टंचाई, चारा छावण्या, रोजगार हमीची कामे, विद्यार्थ्यांची फी माफी, वीज बिल माफी, रेशनिंगवर दोन रुपये किलोने धान्य, शेतळ्यांना शंभर टक्के अनुदान, भुतवडा तलावातला गाळ काढणे, सर्व फळबागांना अनुदान, आष्टी-जेऊर रेल्वेमार्ग जामखेड वरून करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. दुष्काळी उपायायोजना त्वरित सुरू केल्यास या पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मोर्चातील नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमध्ये मोठी अंदाधुंदी!
जिल्ह्यात करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अंदाधुंदी झाली असून शासनाच्या दरापेक्षा कमी दराने येथील अधिकारी कामे देत अाहेत. याद्वारे निधी हडप करत आहेत. पालकमंत्र्यांजवळ काही ठरावीक अधिकारी तोंडपुजक आहेत. त्यामुळे पालकमंत्री बोर्डापुरतेच आहेत काय, असा सवाल माजी मंत्री सुरेश धस यांनी यावेळी केला.