आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनीतभाईनी आचार-विचारांची सांगड घातली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहराच्या विकासासाठी मनात ध्यास असला पाहिजे. जो नवनीतभाईच्या कर्तृत्वातून दिसतो. नवनीतभाईच्या नवनीत या नावातच जादू आहे. नवीन विचार मांडणे आणि तो कार्यान्वित करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होत. त्यांचे विचार हे येणाºया पिढीला मार्गदर्शी ठरतील, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा होते.
नगर अर्बन बँकेत आयोजित स्व. नवनीतभाई बार्शीकर यांच्या जयंतीनिमित्त नवनीत विचार मंच व नवनीत दामदुप्पट ठेव योजनेचा प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, आचारविचारांची सांगड घालणाºया नवनीतभाईचे जीवन नगरलाच नव्हे, तर राज्यासाठी प्रेरणादायी आहे. स्व. बार्शीकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी जन्मदिनाच्या औचित्याने बँकेच्या संचालक मंडळाने नवनीत दामदुप्पट ठेव योजनेची घोषणा केली. यानिमित्ताने नवनीत भाईच्या कार्यकौतुकाविषयी आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केल्याचे ते म्हणाले. यावेळी व्हा. चेअरमन अनिल कोठारी, डी. एम. कांबळे, प्रेमकुमार गिल्डा, डॉ. सुभाष म्हस्के, नगरसेवक संजय चोपडा, नितीन शेलार, अशोक काळे उपस्थित होते.
स्व. नवनीतभाई बार्शीकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी जन्मदिनाच्या औचित्याने बँकेच्या संचालक मंडळाने ‘नवनीत दामदुप्पट ठेव योजनेची’ घोषणा करताच असंख्य ठेव खातेदारांनी या ठेव योजनेत ठेवी गुंतवणूक करून बँकेवरी आपला विश्वास व्यक्त.