आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेहटादेवी देवस्थानात नवरात्रीची तयारी पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - श्रीक्षेत्र माेहटादेवी देवस्थानात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली अाहे. शनिवारी (१ ऑक्टोबर) सायंकाळी देवस्थान समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या हस्ते घटस्थापना होऊन नवरात्राेत्सवाला प्रारंभ होईल.

देवी मुखवट्याची शनिवारी सकाळी सुवर्ण अलंकारासह मोहटे गावातून देवीगडापर्यंत मिरवणूक निघेल. देवी दरबारात दररोज विविध महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. कथा, कीर्तन, जागर, त्रिकाळ महाआरत्या असे कार्यक्रम होणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची, तर १३ तारखेला दुपारी कुस्त्याच्या हगाम्याने यात्रेची सांगता होईल. १२ ऑक्टोबरला एकादशीला यात्रेचा मुख्य दिवस आहे.

धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र शरद कोतनकर, विवेक मुळे, बबन कुलकर्णी, भूषण साकरे, देविदास जोशी करणार आहेत. गेले सुमारे दहा वर्षे चाललेले मंदिर जीर्णोद्धाराचे काम या वर्षी पूर्ण झाले आहे. देशातील देवीमंदिरापैकी सर्वात मोठे मंदिर म्हणून मोहटा देवस्थानकडे पाहिले जाते.

नगर, औरंगाबाद, बारामती, कल्याण, बीड या भागातून लाखो भाविक पायी चालत मोहटादेवी दर्शनाला येतात. देवस्थान समितीतर्फे निवास महाप्रसाद फराळ, चहापाणी, औषधोपचार व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. परिवहन मंडळ देवस्थान समितीतर्फे पाथर्डीहून विशेष गाड्याची सुविधा आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...