आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ncc Cadet Participated In Republic Day Parade At Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्लीत राजपथावर संचलन करणार्‍या छात्रांचा गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- प्रजासत्ताक दिनी नगरमधील 21 एनसीसी छात्र राजपथावरील संचलनात सहभागी झाले होते. 17, महाराष्ट्र बटालियनचे 14 व सत्तावन्न महाराष्ट्र बटालियनचे 7 छात्र त्यात सहभागी झाले होते. त्याबद्दल सत्तावन्न महाराष्ट्र बटालियनच्या सात छात्रांचा गुरुवारी बटालियनचे सीइओ कर्नल पी. एस. देशपांडे यांच्या हस्ते सावेडी येथील एनसीसी कार्यालयात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर बशीर अहमद, सुभेदार मेजर बाबुराव इंगळे, सुभेदार महादेव कांबळे, ट्रेनिंग जेसीओ शांतिभाई मकवान, क्वार्टर मास्टर एस. बी. सिंग उपस्थित होते.

निवड प्रक्रियेचे प्रमुख आर्मीचे चीफ ट्रेनिंग ऑफिसर ब्रिगेडिअर एस. यू. दशरथ होते. सप्टेंबरपासून निवड प्रक्रिया सुरू झाली. शिबिरासाठी राज्यातून सहाशे छात्र आले होते. त्यातील 110 छात्रांची निवड झाली. त्यात एकवीस छात्र नगरचे होते. प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलन करणार्‍या सिनिअर अंडर ऑफिसर पूजा वैद्य, दगडू भांगरे, ज्युनिअर अंडर ऑफिस

स्वप्न प्रत्यक्षात अवतरले
राजपथावर संचलन करायचे माझे स्वप्न होते. ते इतक्या लवकर पूर्ण होईल, असे वाटले नव्हते. 28 डिसेंबर 2013 ते 30 जानेवारी 2014 पर्यंत आम्ही दिल्लीत होतो. ते दिवस मी विसरणार नाही. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. संचलन करताना मी देशाचे प्रतिनिधीत्व करते याचा मला अभिमान वाटतो.’’ पूजा वैद्य, सिनिअर अंडर ऑफिसर.

लष्करात जाणार..
भारतीय लष्करामध्ये मोठय़ा पदावर काम करायचे माझे ध्येय आहे. ते मी नक्कीच पूर्ण करेन याचा मला विश्वास आहे. संचलनाच्या निवड प्रक्रियेच्या वेळी भीती वाटली होती, पण निवड झाल्यानंतर भीती गायब झाली. आत्मविश्वासाने संचलन केले. विविध राज्यांमधील मुलांशी संवाद साधायची संधी यामुळे मला मिळाली. ’’ सुहास सोमासे, सिनिअर अंडर ऑफिसर.