आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Candidates Sangram Jagtap,latest News In Divya Marathi

बिनकामाच्या आमदाराला घरी बसवा : जगताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरात रोजगाराच्या संधी नसल्याने तरुणांना पुणे व मुंबईसारख्या शहरांची वाट धरावी लागते. हे थांबवण्यासाठी बिनकामाच्या आमदाराला घरी बसवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी केले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी प्रशील पबाडळकर, राहुल नौर, सचिन डोके, महेश डोके, राहुल पवार, संदीप ठोंबरे, बाळासाहेब राणे, राहुल ठोंबरे, अविनाश ढवण, आकाश कातोरे, हेमंत आभाळे, गणेश पवार, स्वप्नील वारे आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, आमदाराने विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले असते, तर नक्कीच शहराच्या विकासासाठी निधी मिळाला असता. आता तरुणाईला बदल हवा आहे. शैक्षणिक सुविधांबरोबरच रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्याची गरज आहे. नगरचा उच्चशिक्षित युवक नगरमध्येच राहावा, यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या येथे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.