आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निमित्त शिवजयंतीचे शक्तिप्रदर्शन राष्ट्रवादीचे; भुजबळ, पाटील, पाचपुते आज विश्रामगडावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - आढळा खोर्‍यातील विश्रामगडावर मंगळवारी (19 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजयंती सोहळा साजरा होत आहे. पर्यटनमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील, पालकमंत्री बबनराव पाचपुते, प्रदेशाध्यक्ष, आमदार मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत होणार्‍या या कार्यक्रमात आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने पट्टाकिल्ला परिसरातील गावांमध्ये मोठमोठे फ्लेक्स व होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. तालुक्यात पर्यटनवाढीसाठी चालना मिळाली पाहिजे, स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठी तालुक्यातील गड-किल्ल्यांची डागडुजी करण्यात येऊन पर्यटनविकासाला गती मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे प्रयोजन असल्याचे सांगत हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावे, फतवे राष्ट्रवादीच्या वतीने सर्वत्र बजावण्यात आले आहेत. पट्टाकिल्ल्यावर प्रथमच एवढय़ा मोठय़ा उत्साहात शिवजयंती सोहळा पार पडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व तरुण कार्यकर्ते व जनता या कार्यक्रमात सहभागी होत असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे, असे पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव म्हणाले.

शिवजयंती उत्सव सर्वांनीच साजरा केला पाहिजे. कारण तो महाराजांचा उत्सव आहे. यानिमित्ताने तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळणार असून इतिहासालाही उजाळा मिळणार आहे, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या शक्तिप्रदर्शनावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मागीलवर्षी दुष्काळात आढळा खोरे व तालुक्यातील जनता व पशुधन कसे जगले, हे पहायलासुद्धा पिचड आले नाहीत. चारा व पाण्याअभावी जनावरे पटापट मरत असताना पिचड यांच्यासह कोणताही कार्यकर्ता जनतेचे दु:ख हलके करण्यासाठी या भागात फिरकला नाही. आता मात्र, निवडणुका समोर दिसू लागल्यानंतर त्यांना गडकिल्ले व पर्यटनवाढीस चालना देण्याची आठवण होत आहे, ही आमच्या दृष्टीने व तालुक्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे, असे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव अजित नवले म्हणाले.

तालुक्यात राष्ट्रवादीने एवढय़ा मोठय़ा स्वरूपातच काय, पण साध्या स्वरूपातही कधी शिवजयंती साजरी केली नाही. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांचे प्रेम, आस्था व अस्मिता उफाळून आली आहे. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केली.

ऐतिहासिक महत्त्व
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य 1679 मध्ये सुमारे पंधरा दिवस पट्टाकिल्ल्यावर होते. या किल्ल्यावर अनेक वास्तुंचे अवशेष आजही पहायला मिळतात.