आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राष्ट्रवादी'च्या सातशे कार्यकर्त्यांचे राजीनामे; पाचपुते विरोधकांना बळ देत असल्याचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलून पालकमंत्री बबनराव पाचपुते विरोधकांना बळ देत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यातील पदाधिकार्‍यांसह 700 कार्यकर्त्यांनी सोमवारी सामूहिक राजीनामे दिल़े यापुढील काळात ताकद देण्याची जाहीर ग्वाही दिली, तरच पक्षाबरोबर राहू, असा इशाराही जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत देण्यात आला़

राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकी नसल्याचे स्पष्ट करून कार्यकर्त्यांनी दुजाभाव दूर करण्याचे आवाहन करण्यात आल़े सर्वच वक्त्यांनी पाचपुते यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. तालुकाध्यक्ष पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ही बैठक झाली.

आमदार औटी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना फसवून कामे करून घेत असल्याचा आरोप सुजित झावरे यांनी केला़ पाचपुते यांचा औटी यांना छुपा पाठिंबा आहे. आम्ही हजारो कामे सांगितली, परंतु ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात़ मदत करण्याऐवजी आडकाठी आणून रडकुंडीस आणले जात़े विरोधकांची कामे मार्गी लावून त्यांना अप्रत्यक्षपणे बळच दिले जात़े, असे झावरे म्हणाले. उदय शेळके यांनीही पाचपुतेंवर टीका केली़ जिल्हा बँकेच्या माध्यमातून सेवा संस्थांना जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी पाच लाखांचे कॅशक्रेडिट देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.