आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, महावितरण कार्यालयात पाच तास ठिय्या आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरात सुरू असलेले भारनियमन बंद करण्याच्या दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महावितरण कार्यालयात पाच तास ठिय्या आंदोलन केले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी पाचारण केल्याने पोलिसांनी आमदार जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत नंतर सोडून दिले. 
 
शहरातील भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने महावितरणच्या कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी गुरुवारपर्यंत (१४ सप्टेंबर) भारनियमन बंद करण्याचे लेखी आश्वासन महावितरणचे अधीक्षक अभियंता अिनल बोरसे यांनी दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता करता महावितरणने नव्याने भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार जगताप यांनी गुरुवारी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादीचे युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अिभजित खोसे, उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, जॉय लोखंडे, गुड्डू खताळ, मळू गाडळकर, गौतम भांबळ, स्वप्नील ढवण उपस्थित होते. 
 
भारनियमन बंद करा, मगच आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने महावितरण कार्यालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आमदार जगताप अधीक्षक अिभयंता बोरसे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने महािवतरणच्या अिधकाऱ्यांनी पोलिसांनी बोलावले. पोलिसांनी आमदार जगताप यांना ताब्यात घेत कोतवाली पोलिस ठाण्यात आणले. तेथे प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले. 
 
भारनियमनामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. दोन टप्प्यांत तब्बल सव्वा नऊ तासांपर्यंत भारनियमन सुरू आहे. सोमवारपर्यंत भारनियमन बंद झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असे आमदार जगताप यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...