आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची दहशत खपवून घेणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - तोफखाना परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. या भागातील शिवसेनेची दहशत राष्ट्रवादी यापुढे खपवून घेणार नाही, असा इशारा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांनी दिला.

शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात जगताप बोलत होते. याप्रसंगी आमदार अरुण जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, अँड. शारदा लगड, सुरेश आंबेकर, अंबादास गारूडकर आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, तोफखाना परिसरातील संदीप जाधव व सहकार्‍यांनी आपल्या भागात राष्ट्रवादीच्या शाखा सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या भागात दुसर्‍या पक्षाचा नेता एखाद्या घरगुती कार्यक्रमाला जरी आला, तरी सेनेकडून त्रास दिला जातो. त्यामुळे दुसर्‍या पक्षातील नेत्यांना बोलवायला नागरिक घाबरतात. मात्र, आता या भागात राष्ट्रवादीच्या शाखा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सेनेची दहशत खपवून घेतली जाणार नाही. जिल्हाध्यक्ष शेलार म्हणाले, राष्ट्रवादी हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. शहरातही तो नंबर एकवर आहे. गेल्या 25 वर्षांपासून शहराची अधोगती सुरू आहे. शहराचे आमदार सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांना फसवत आहेत. कळमकर म्हणाले, तोफखाना परिसरात विडी कामगार व विणकर मोठय़ा प्रमाणात होते. परंतु शहराच्या आमदाराने त्यांच्या रोजीरोटीकडे दुर्लक्ष केले. भावनिक विधाने करून तरुणांची माथी भडकवण्याचा एककलमी उद्योग आमदार करतात.