आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या गळ्यातील सात तोळ्यांचे गंठण लांबवले; पोलिसांकडून घटनेची माहिती दडपण्याचा प्रताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सात तोळ्यांचे गंठण पल्सरवर आलेल्या दोघांनी लांबवले. महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या आरोपींचा शहर पोलिसांना दोन दिवसानंतरदेखील मागमूस लागू शकला नाही. पोलिसांना आव्हान देणाऱ्या या घटनेची माहिती दाबण्याचा संगमनेर पोलिसांचा प्रतापही यामुळे समोर आला. दोनच दिवसांपूर्वी तालुक्यात सात लाखांची रोकड अशाच पद्धतीने लांबवण्याचा प्रकार घडला होता. 

अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालणारे शहर पोलिस गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. 

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात अपयश आलेल्या एसपी सौरभ त्रिपाठी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रंजनकुमार शर्मा यांची नियुक्ती झाली. श्रीरामपूर विभागात संजय जाधव यांच्या जागी रोहिदास पवार यांची अतिरिक्त अधीक्षकपदी नियुक्ती झाली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी पदभार हाती घेताच गुन्हेगारीने चर्चेत असलेल्या संगमनेरने त्यांच्यासमोर गुन्ह्याची सलामी दिली. दोन दिवसांपूर्वीच नाशिक-पुणे महामार्गालगतच्या कऱ्हे शिवारात सव्वासात लाखाची रोकड बंदुकीचा धाक दाखवत मोटारसायकलस्वारांनी लांबवली. गुरुवारी दुपारी वर्दळीच्या रस्त्यावरुन जात असताना गणेशनगर भाजीबाजाराजवळ मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी सरिता प्रकाश माने ( इंदिरानगर) यांच्या गळ्यातील सात तोळ्यांचे सोन्याचे गंठण लांबवले. गंठण लांबवताना या चोरट्यांनी महिलेला इजादेखील केली. 

गुरुवारी दुपारी घडलेल्या या प्रकाराची फिर्याद पोलिसांनी नांेदवत याची माहिती माध्यमांपासून दडवली. मंगळसूत्र चोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकुळ घातला असुन पोलिसांना या चोरट्यांचा शोध लावण्यात सपशेल अपयश आले आहे. पाेलिस डायरीला संबधित महिलेचे केवळ ५९ हजार रुपये किमतीचे साडेचार तोळ्यांचे गंठण लांबवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अन्सार इनामदार तपास करुन असून गेल्या दोन दिवसात पोलिसांना आरोपीचे धागेदोरेदेखील मिळवता आलेले नाही. 
बातम्या आणखी आहेत...