आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज ३२ ची, काटेपूर्णात उरला प्रत्यक्षात २६ दलघमी जलसाठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहरासह विविध योजनांच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्यासाठी २५ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. यात बाष्पीभवनासह इतर अपव्यय लक्षात घेता प्रत्यक्षात ३२ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. काटेपूर्णा प्रकल्पात सप्टेंबरअखेर केवळ २५.८८ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध जलसाठा प्रत्यक्षात पाण्याची गरज आणि पुढे पाऊस आल्यास या सर्व बाबी लक्षात घेता, पाणीपुरवठ्यात कपात केल्यास उन्हाळ्यापूर्वीच शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून काटेपूर्णा प्रकल्प ओळखला जातो. या प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दशलक्ष घनमीटर आहे, तर मृतसाठ्याची पातळी ११ दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पातून मत्स्योत्पादनासह विविध पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३४.३२ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. उर्वरित जलसाठ्यातून आठ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणल्या जाते. परंतु, मागच्या वर्षी प्रकल्पाने शंभर टक्के पातळी गाठल्याने सिंचनाकरिता पाणी सोडता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागले. या वर्षीही पावसाळा संपत आला असताना काटेपूर्णा प्रकल्पात ५० टक्के जलसाठाही उपलब्ध झालेला नाही. सप्टेंबर महिना संपत आहे.
दरवर्षी ऑक्टोबर अखेरीस प्रकल्पातील जलसाठा लक्षात घेऊन विविध पाणीपुरवठा योजना तसेच सिंचनासाठी पाणी आरक्षित केले जाते. परंतु, या पुढील महिन्यात जोरदार पाऊस होईल की नाही? याबाबत कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. त्यामुळेच पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास शहरासह विविध गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्याप महापालिकेने मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पाणीकपातीचा निर्णय घेतला नाही. मात्र, पाऊस झाल्यास पाणीकपातीचा निर्णय घेतल्यास पुढे पाण्यासाठी हाहाकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तूर्तास सहा दिवसांआड पाणी तूर्ताससहा दिवसांआड पाणीपुरवठा करताना वर्षाकाठी २० दलघमी पाण्याची गरज शहराला भासते. पाणीपुरवठ्याच्या दिवसांत आताच वाढ झाल्यास उन्हाळ्यापूर्वीच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. अद्याप महापालिकेने मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पाणीकपातीचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, पाऊस झाल्यास पाणीकपातीचा निर्णय घेतल्यास पुढे पाण्यासाठी हाहाकार होऊ शकतो.

२४.७६ दलघमीची उचल काटेपूर्णातूनवर्षाकाठी २४.७६ दलघमी पाण्याची उचल केली जाते. ही प्रत्यक्षात केलेली उचल आहे. परंतु, होणारे बाष्पीभवन, वहन व्यय आणि पाझर यात ३० टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे पाण्याची उचल जरी २४.७६ दलघमी पाण्याची केली जात असली, तरी प्रत्यक्षात ३२.१८ दलघमी पाण्याची गरज आहे.
1.50
मत्स्योत्पादन
दलघमी
1.17
खेडी पाणीपुरवठा योजना
दलघमी
0.70
औद्योगिक वसाहत
दलघमी
0.79
६० खेडी पाणीपुरवठा योजना
दलघमी
0.60
मूर्तिजापूर पाणीपुरवठा योजना
दलघमी
अकोला शहर पाणीपुरवठा योजना
20
दलघमी
वान
72.84
उर्ध्व मोर्णा
1.46
उमा
3.47
निर्गुणा
15.55
मोर्णा
15.94
काटेपूर्णा
25.88