आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचाराविरोधात कडक कायदे व्हावेत, निर्भय कन्या अभियानाच्या शिल्पा केदारी यांची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- देशामध्ये महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. छेडछाड, लैंगिक शोषण, हुंडाबळी सारखे अत्याचार वाढत आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कडक कायदे केले पाहिजेत, अशी अपेक्षा स्नेहाधार संचलित िनर्भय कन्या अभियानाच्या प्रकल्प समन्वयक शिल्पा केदारी यांनी व्यक्त केली.
हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयात महिला अत्याचार व लैंगिक प्रतिबंध समितीतर्फे स्नेहाधार संस्थेच्या सहकार्याने आयोजित िनर्भय कन्या अभियानांतर्गत िवशेष प्रबोधनात्मक व्याखानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. अमरजा रेखी होत्या. उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, प्रा. सुजाता काळे, प्रबंधक अशोक असेरी, प्रा. संजय धोपावकर, डॉ. विद्या सहस्त्रबुध्दे आदी यावेळी उपस्थित होते. केदारी म्हणाल्या, महिलांवर अत्याचार हे जवळच्याच व्यक्तीकडून सर्वात जास्त होत असतात. त्यामुळे महिलांनी हे अत्याचार रोखण्यासाठी पुढे यावे. शासनाने महिलांवरील अत्याचाराच्या िवरोधात कडक कायदे करणे आवश्यक आहे. देशात कायदे कडक असले, तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. आपल्या अवतीभोवती, जर अत्याचाराच्या घटना घडत
असतील, तर संबंधितांनी तातडीने पोलिस ठाणे, चाइल्ड लाइन, स्नेहाधार संस्थांशी संपर्क साधावा. अत्याचाराला लढून नव्हे, तर धैर्याने प्रतिकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक निर्भय कन्या अभियानाच्या समन्वयक प्रा. सुनीता गायकवाड यांनी, तर आभार प्रा. माहेश्वरी गावित यांनी मानले.

मुलींनी स्वसंरक्षणासाठी उपकरणे बाळगावे-
सर्वच ठिकाणी मुली विविध अत्याचारांना सातत्याने बळ‌ी पडत आहेत. अत्याचाराला खंबीरपणे न घाबरता, मुलींनी तोंड देऊन प्रतिकार केला पाहिजे. स्वसंरक्षणासाठी काही उपकरणे स्वत:जवळ बाळगावेत. त्याचबरोबर कराटे सारखे प्रशिक्षणदेखील घ्यावे.'' डॉ. अमरजा रेखी, प्राचार्या.