आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neharu Youth Center News In Marathi, Divya Marathi

नेहरू युवा केंद्रामुळे युवक विधायक मार्गाला युवाशक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- युवकांना विधायक दिशेने घेऊन जाण्याचे काम नेहरू युवा केंद्र प्रभावीपणे करत आहे. युवाशक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.

नेहरू युवा केंद्रातर्फे ‘राष्ट्रीय युवा धोरण 2014’ च्या पदयात्रेचा उद्घाटन जिल्हाधिकारी कवडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाला. त्यावेळी ते बोलत होते. भाऊराव वीर, महेश बारगोजे, प्रा. रमेश वाघमारे, महेश शिंदे, प्रसाद भडके, नयना बनकर आदी यावेळी उपस्थित होते. या पदयात्रेला जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात झाली. मुख्य रस्त्यांनी जाऊन वाडिया पार्क येथे पदयात्रेचा समारोप झाला. कवडे म्हणाले, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाचे ‘युवा धोरण 2014’ हे 1 एप्रिलपासून देशातील 623 जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. या धोरणांत युवकांसाठी शिक्षण स्वयंरोजगार प्रशिक्षण, उद्योग, क्षमता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

भारत निर्माणमध्ये जास्तीत जास्त युवकांचा सहभाग घेणे व समान अधिकारांतर्गत युवा पिढीमध्ये सामाजिक सद्भावना निर्माण करणे या उपक्रमांसाठी युवा कार्यक्रम खेल मंत्रालयाच्या अंतर्गत राजीव गांधी खेल अभियानाद्वारे युवकांना खेळाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करण्यासाठी या ‘युवा धोरण 2014’ ची निश्चिती करण्यात आली आहे, असे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांनी सांगितले.