आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन लाखांच्या कांद्याची विल्हेवाट लावणारा गजाआड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नेप्ती शिवारातील कांदा मार्केटमधून सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या कांद्याची परस्पर विल्हेवाट लावणा-या मालट्रकचालकाला पोलिसांनी गजाआड केले आहे. महादेव ज्ञानेश्वर कामठे (रा. जातेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. नगर तालुका पोलिसांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या.
कांदा व्यापारी घनश्याम महावीर पारिक (सिद्धिविनायक कॉलनी, बुरूडगाव रोड, भोसले आखाडा, नगर) यांनी सहयोग ट्रान्स्पोर्टमार्फत सुमारे 3 लाख 67 हजार 880 रुपयांचा कांदा ए. एस. एस. व्हेजिटेबल, बेसिन रोड (एर्नाकुलम, केरळ) येथे पाठवला होता. मालट्रकमध्ये एमएच 12 एझेड 4296) हा कांदा भरून महादेव कामठे यांच्याकडे भाड्यापोटी काही रक्कमही पारिक यांनी दिली होती. परंतु, कामठे याने कांदा नियोजित ठिकाणी न नेता परस्पर त्याची विल्हेवाट लावली अन् नंतर पळून गेला. याप्रकरणी पारिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार एम. एम. शेख करीत होते. सह्योग ट्रान्स्पोर्टनेही आरोपीच्या अटकेसाठी पाठपुरावा केला. शुक्रवारी महादेव कामठे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.