आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेट-नेटच्या तिसर्‍या पेपरमध्ये बदल होणार; डॉ. आनंद कुलकर्णी यांची माहिती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: नेट व सेट परीक्षा देताना तिसर्‍या पेपरमध्ये बदल होणार असून, आता यापुढील काळात सर्व पेपर वैकल्पिक स्वरूपाचे असतील, अशी माहिती डॉ. आनंद कुलकर्णी यांनी दिली.
न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित सेट-नेट परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलकर्णी बोलत होते. प्रा. सुरेश खरात, प्रा. बाळासाहेब सागडे, के. डी. सोनवणे, प्रा. बी. डी. घोडके, प्रा. एच. आर. गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाले की, सेट-नेट परीक्षेचा पेपर देत असताना सुरुवातीचे दोन पेपरमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होत असत. मात्र, अनेकदा तिसरा पेपर लिहिताना अनेक विद्यार्थ्यांना वेळेत पेपर सोडवता येत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाची माहिती असूनही ही परीक्षा उत्तीर्ण होता येत नव्हते. यासाठी यामध्ये बदल होण्याची शक्यता असून, आता सर्व पेपर वैकल्पिक स्वरूपात करण्याचा विचार युजीसी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना अगोदर तो विषय समजून घेणे आवश्यक आहे. पेपर लिहित असतानाही वेिषणात्मक उत्तरे लिहण्यात वेळ न घालवता मुद्देसूद व आवश्यक तितकेच उत्तरे लिहिल्यास ही परीक्षा सहज उत्तीर्ण होता येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज किमान चार तास अभ्यास करणे आवश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा व सेट - नेट परीक्षा वेगळी आहे. यावेळी त्यांनी उदाहरणासह पेपर कसा लिहायचा हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रा. सुरेश खरात यांनी स्वागत केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. बी. डी. घोडके यांनी, तर आभार प्रा. जयर्शी आहेर यांनी मा