आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New Ceilling Act Only For The Minister Blaim Raghunathdada Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या सिलिंग कायद्याने मंत्र्यांच्या जमिनी जातील, रघुनाथदादा पाटील यांचे टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नवा सिलिंग कायदा लागू केल्यास शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावणार्‍या मंत्र्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यातून जातील, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली. अन्न सुरक्षा विधेयकामुळे देश रसातळाला जाईल, अशी भीतीही त्यांनी र्शीरामपूर येथे बुधवारी बोलताना व्यक्त केली.

शेतकरी संघटनेतर्फे लोणी येथे 25 ऑगस्टला कृषी, पणन परिषद होत आहे. या परिषदेच्या तयारीसाठी सरकारी विर्शामगृहावर झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, शेतकर्‍यांकडे 25 एकरांपेक्षा जास्त जमीनच नाही. त्यामुळे हा कायदा शेतकर्‍यांसाठी चांगला आहे. नेत्यांनी ट्रस्ट व कंपन्यांच्या नावावर या जमिनी घेतल्या आहेत. या कायद्यामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व रॉबर्ट वढेरा यांच्यासह राज्यातील मंत्र्यांकडे असलेल्या जमिनी सरकारला काढून घ्याव्या लागतील. त्यामुळे नव्या कायद्याला शरद पवार व सरकारचा विरोध आहे. संघटनेचे नेते शिवाजी नांदखिले यावेळी उपस्थित होते.