आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनिर्माण - संगमनेरमध्ये उभारणार 17 कोटी 21 लाखांचे न्यायालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - शहरात नव्याने होत असलेल्या न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी 17 कोटी 21 लाख रुपयांच्या खर्चास शासनाने नुकतीच मंजुरी दिली.
संगमनेरात सध्या दोन जिल्हा न्यायाधिश, एक दिवाणी न्यायाधीश, एक वरिष्ठस्तर न्यायाधीश, पाच दिवाणी व कनिष्ठस्तर न्यायाधिशांची न्यायालये आहेत. ही सर्व न्यायालये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. एका इमारतीत ही न्यायालये नसल्याने वकील, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस यांची मोठी गैरसोय होत होते. त्यामुळे सर्वांच्या सोयीसाठी एकाच इमारतीत न्यायालयांचे कामकाज व्हावे, अशी मागणी होत होती. वकील संघाने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला. थोरात यांनीही या प्रश्नी प्रयत्न केल्याने निधी मंजूर झाला. सध्याची न्यायालये व भविष्यात येऊ घातलेली औद्योगिक व कामगार न्यायालये यांचा विचार करून जवळपास 16 न्यायालयांसाठी शासनाने 17 कोटी 21 लाख 41 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अर्थसंकल्पात तरतूद झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी अभियंत्यास नोटीस बजावणार - उच्च् न्यायालयाच्या मान्यतेनंतर न्यायालयाची इमारत व निवासस्थाने याचे आराखडे तयार करून बांधकामासाठी लागणार्‍या निधीसाठी विखे व पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला. विधी व न्याय राज्यमंत्री भास्करराव जाधव यांनी तातडीने मंजुरीची शिफारस केल्यानंतर उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री असलेल्या अजित पवार यांनी तातडीने निधी मंजूर केला आहे. स्थानिक नेत्यांनी जागेसाठीच विरोध केला. मात्र, कार्यकारी अभियंता एस. एस. लोळगे स्थानिक नेत्यांना त्याचे र्शेय देत आहेत. वकील संघ याबाबत अभियंता लोळगे यांना नोटीस बजावणार आहे.’’अँड. प्रल्हाद कातोरे, अध्यक्ष, वकील संघ.
निधीच्या श्रेयावरून कलगीतुरा - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून बांधकामासाठी हा निधी मिळाल्याची माहिती बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता एस. एस. लोळगे यांच्या नावाने देण्यात आली. मात्र, वकील संघाने त्यावर आक्षेप घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे हा निधी मंजूर झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे काम सुरू होण्यापूर्वीच मंजूर निधीचे र्शेय घेण्यावरून वकील संघ व सार्वजनिक बांधकाम विभागात चांगलाच कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.