आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन गॅस कनेक्शनला चहा, इस्त्रीचा आग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नवीन गॅस कनेक्शन घेताना ग्राहकांना शेगडीचा देखील आग्रह न करण्याचा पुरवठा विभागाचा आदेश असताना या आदेशाला हरताळ फासत शहरातील आनंद गॅस एजन्सीकडून ग्राहकांना नवीन गॅससाठी चहा पावडर व इस्त्रीचा घेण्याचा आग्रह धरला जात आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत जिल्हा पुरवठा विभागाने संबंधित गॅस कंपनीकडून अहवाल मागवला आहे.

छावा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सांगळे गॅसच्या दुसर्‍या सिलिंडर कनेक्शनसाठी आनंद एजन्सीत गेले. तेथे त्यांना नवीन टाकीबरोबर 1 हजार 200 रुपयांचा पाच किलो तांदूळ खरेदीची सक्ती करण्यात आली. गरज असल्याने सांगळे यांनी या सिलिंडरबरोबर तांदूळ घेतला होता. याबाबत सांगळे यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात येऊन बाराशे रुपयांचा चार किलो तांदूळ घेतल्याची पावती दिली होती. त्यानंतर रविवार (3 डिसेंबर) ला ‘दिव्य मराठी’ने नवीन गॅस हवाय, मग बाराशेंचा तांदूळ घ्या. अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर देखील या एजन्सीकडून ग्राहकांची लूट सुरूच आहे.आता तांदूळ संपल्याने एजन्सी ग्राहकांना नवीन गॅस कनेक्शनसाठी चहा पावडर व इस्त्री घेण्याचा आग्रह धरत आहे.

ग्राहकांना वर्षाकाठी अनुदानित केवळ नऊ सिलिंडर मिळणार आहेत. मोठय़ा कुटुंबाना 9 सिलिंडर कमी पडत असल्याने ग्राहक नवीन अथवा दुसर्‍या गॅस सिलिंडर घेत आहेत. शहरातील गॅस एजन्सीमध्ये दोन सिलिंडर घेणार्‍या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने त्याचाच फायदा आनंद गॅस एजन्सीने घेतला आहे. नवीन टाकीची किंमत 2 हजार 98 रुपये आहे. परंतु ज्या ग्राहकांनी सिलिंडरसाठी नवीन कनेक्शन घेतले, त्या ग्राहकांना नियमबाह्य चहा पावडर व इस्त्री घेण्याचा आग्रह धरला जात आहे.

एजन्सीने तातडीने लूट थांबवावी
गॅसच्या दुसर्‍या सिलिंडरसाठी आनंद एजन्सीत गेल्यानंतर त्यांनी मला नवीन टाकीबरोबर 1250 रुपयांची चहा पावडर व इस्त्री घ्यावी लागेल, असा आग्रह धरला. नवीन टाकी गरजेची असल्याने मी नवीन सिलिंडरसाठी 3200 रुपये भरले. गुरुवारी (21 नोव्हेंबर) सिलिंडर मिळणार आहे. 1250 रुपये अतिरिक्त घेण्यात आले. एजन्सीने बळजबरीने चहा व इस्त्रीची ही लूट तातडीने थांबवावी.’’ मुकुंद पंत, ग्राहक.

घरपोहोच सेवेचाही बोजवारा
गॅस सिलिंडर घरपोहोच देण्याची सुविधा आहे. मात्र, शहरात या सेवेचा बोजवारा उडाला आहे. घरपोहोचसाठी पैसे दिलेले असताना गॅस वितरण करणारे संबंधित भागातील एका चौकात सर्व ग्राहकांना बोलावून गॅसची टाकी देतात. त्यासाठी लांबलचक रांग लावावी लागते. त्याचा मोठा त्रास ग्राहकांना सहन करावा लागतो. ’’ अनुप चव्हाण, ग्राहक.