आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळखपत्रामुळे नगरच्या कारागिरांना नव्या संधी, गांधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर मध्येएकाहून एक सरस कलाकार कारागीर आहेत. गणपती मूर्तिकार, सोन्या-चांदीचे कारागीर, फायबर मूर्तिकार, बांबू कारागिरी, कुंभार, छायाचित्रकार, पेंटर असे अनेक क्षेत्रांत नावाजलेले कलाकार येथे आहेत. सरकारी लाभापासून हे सर्व कलाकार दूर आहेत. अशा सर्व कलाकारांना एकत्र आणून त्यांच्या कलागुणांची दाखल घेऊन त्यांचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी वस्त्रोउद्योग हस्तकला मंत्रालयाच्या वतीने त्यांना विशेष ओळखपत्र दिले जाणार आहे. स्कील डेव्हलमेंट योजनेंतर्गत कलाकारांना संधी उपलब्ध होईल, जीवन विमा योजनेमुळे आयुष्य सुरक्षित होईल, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत नगरमध्ये आयोजित मेळाव्यात कलाकार हस्त कारागिरांना ओळखपत्र वाटप खासदार गांधी यांच्या हस्ते लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झाले. यावेळी वस्त्रोद्योग मंत्रालयाचे संचालक राजेंद्र सिंग, शिल्पकार प्रमोद कांबळे, उपमहापौर श्रीपाद छिंदम, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र दायमा, महिला आघाडीच्या अध्यक्ष गीतांजली काळे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, शहर चिटणीस किशोर बोरा, अर्बन बँक संचालक दीपक गांधी आदींसह भारतीय आयुर्विमा महामंडळ वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.

राजेंद्र सिंग म्हणाले, वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत कलाकारांची नोंदणी करून त्यांना विशेष ओळखपत्र प्रदान करत आहोत, जेणेकरून त्यांच्या कलेची नोंद शासकीय स्तरावर केली जाईल. या नोंदीमुळे त्यांच्या कलेचे राष्ट्रीयस्तरावर मार्केटिंग होणार आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मेळाव्यात थेट सहभागी होता येईल. प्रत्येक वर्षी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होते. ६० व्या वर्षानंतर हजार रुपये महिना निवृत्तीवेतनही देण्यात येणार आहे.

प्रमोद कांबळे म्हणाले, नगरमधील कलाकारांना उचित योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. आजच्या मेळाव्यामुळे कलाकारांना योग्य मार्ग मिळाला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ नक्कीच सर्व कारागीर घेतील. उपमहापौर छिंदम म्हणाले, हस्तकला दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. येणाऱ्या पिढीला जुन्या पारंपरिक हस्तकलेचे ज्ञान देणे आवश्यक आहे. हस्तकलेची जपवणूक करणे आवश्यक आहे. लोप पावत चाललेली हस्तकला संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी सरकारने मोठे काम केले आहे. यावेळी गीतांजली काळे, सुवेंद्र गांधी यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन हस्तकला संवर्धन अधिकारी के. सी. साहू यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...