आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस दलात नवे गडी, अन् आव्हान मात्र जुनेच..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यभरात झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली सत्रात जिल्हा पोलिस दलाला दोन नवे आयपीएस अधिकारी मिळाले आहेत. दोन्हीही अधिकारी नवे असले, तरी जिल्ह्यातील गुन्हेगारी लक्षात घेता त्यांच्यासमोर असलेली आव्हाने मात्र जुनीच आहेत. अलीकडेच 'माेक्का' लागलेल्या टोळ्यांचे फरार असलेले मुख्य सूत्रधार पकडणे, जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात असलेली गावठी पिस्तुले शोधणे अन् सर्व गुन्हेगारीचे मूळ असलेली वाळूतस्करी रोखणे यावरच नूतन पोलिस अधिकाऱ्यांना प्राधान्याने लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

मावळते पोलिस अधीक्षक लखमी गौतम अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या. आता पोलिस अधीक्षक म्हणून सौरभ त्रिपाठी हा नवा चेहरा जिल्ह्याला लाभला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांनीही नुकताच पदभार स्वीकारला. दोघेही नव्या दमाचे तरुण "आयपीएस' अधिकारी असून रुजू होताच त्यांनी झपाट्याने कामाला सुरुवात केली आहे. त्रिपाठी यांनी दोन दिवसांपासून अचानक पोलिस ठाण्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाचे अवलोकन केले, पंकज देशमुख यांनी शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून पैकी पोलिस उपअधीक्षकांची पदे रिक्त आहेत. उर्वरित दोन उपअधीक्षकांवर कामाचा प्रचंड ताण आहे. साहजिकच याचा परिणाम गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तपासावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे रिक्त उपअधीक्षकांची पदे त्वरित भरण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांना कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत; अन्यथा उपलब्ध अधिकाऱ्यांची यापुढेही दमछाक होणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील २० पोलिस निरीक्षकांचे विनंती बदलीचे अर्ज प्रलंबित आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखावी लागणार आहे.

गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात चार टोळ्यांवर "माेक्का कायद्यां'तर्गत कारवाई झाली. पण या टोळ्यांचे मुख्य सूत्रधार असलेले दोन खतरनाक गुन्हेगार मात्र अजूनही फरारच आहेत. जामखेड तालुक्यात झालेल्या शिवसेना तालुकाप्रमुख ठाणेकर खूनप्रकरणातील दरोडेखोर टोळीचा मास्टरमाईंड रवि भोसले, शेवगावात पोलिस कर्मचाऱ्याचा खून करणारा पिन्या कापसे हे दोघे अजूनही गुन्हे शाखेच्या पोलिसांना गवसलेले नाहीत. बऱ्याचदा दोघांपर्यंत पोहोचूनही स्थानिक गुन्हे शाखेला त्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयश आले. त्यामुळे या दोघांना अटक करणे हा आता पोलिसांच्या इभ्रतीचा प्रश्न झाला आहे.
पंकज देशमुख
सौरभ ित्रपाठी

शिस्त लावण्याचे धाडस हवे
जिल्हापोलिस दलाला लागलेली शिस्त कायम ठेवण्याचे आव्हान नूतन अधिकाऱ्यांसमोर आहे. शुक्रवारी कोतवाली पोलिस ठाण्यात एका हवालदाराला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. अशा कर्मचाऱ्यांवर धाक ठेवण्याचे कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे नूतन वरिष्ठ अधिकाऱ्यांना क्रमप्राप्त ठरणार आहे. घरफोड्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिस गस्त वाढवावी लागेल. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल ढाबे वेळेवर बंद झाले, तर "नाईटलाईफ'ला आळा बसून गुन्हेगारीवर अंकुश राहील. किरकोळ कारणासाठी चिरीमिरी घेणाऱ्यांना धडा शिकवण्याचे धाडसही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवावे लागणार आहे.

वाळू तस्करांवरील कारवाईचे काय ?
नगरजिल्हा वाळूतस्करीकरिता कुप्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सर्वत्र फोफावलेल्या गुंडगिरीचे, गावठी पिस्तुलांच्या खरेदी-विक्री व्यवहारांचे मूळ कारणही वाळूतस्करीच आहे. पण राजकीय वरदहस्तामुळे वाळूतस्करांवर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नाही. मावळते पोलिस अधीक्षक लखमी गौतम अतिरिक्त अधीक्षक बलकवडे यांनी वाळूतस्करांविरुद्ध कठोर माेहीम राबवली. या जोडीच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या महिन्यांत १५१ गुन्हे दाखल करून ३३१ वाळूतस्करांच्या मुसक्या आवळल्या. सुमारे १५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. यापुढेही कारवायांमध्ये सातत्य ठेवावे लागेल.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळावी बळकटी
स्थानिकगुन्हे शाखेला पोलिस दलाचे नाक, कान अन् डोळे असे संबोधले जाते. ठाणेकर हत्याप्रकरण जवखेडे तिहेरी हत्याकांड या दाेन्ही घटनांमध्ये गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. पण काही 'ठरावीक' "अननुभवी' कर्मचाऱ्यांमुळे गुन्हे शाखेच्या सक्षमतेविषयी वारंवार वावड्या उठत राहिल्या. या 'ठरावीक' कर्मचाऱ्यांबद्दल आधीच्या अधिकाऱ्यांकडेही तक्रारी गेल्या होत्या. त्यामुळे आता अनुभवी धाडसी कर्मचाऱ्यांचा समावेश करून स्थानिक गुन्हे शाखेला बळकटी देण्याचे कामही नूतन पोलिस अधीक्षकांना करावे लागणार आहे. त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...