आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेक लाडकी अभियानाने जिल्ह्यात वाढणार मुलींची संख्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - घसरणारा स्त्रीजन्म दर वाढवण्यासाठी दलित महिला विकास मंडळाच्या वतीने जिल्ह्यात "लेक लाडकी अभियान' राबवले जाणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रातून तीन याप्रमाणे २८८ जणांना संस्थेच्या वतीने ट्रेनिंग दिले जाईल. या प्रशिक्षित व्यक्ती प्रत्येकी नऊ गावांतील ग्रामपातळीवरील आरोग्य, पोषण स्वच्छता समिती सदस्यांच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करणार आहेत.
मुलगी नको, या नकारात्मक भूमिकेतून गर्भाशयातच मुलींचा शोध घेऊन त्या नष्ट केल्या जातात. देशभरात दरवर्षी सहा लाख मुली गर्भपातामुळे जन्माला येत नाहीत. लोकसंख्येचा समतोल ढासळत असून बलात्कारासारख्या गंभीर परिणामांना तोंड देण्याची वेळ आली आहे.
लेक लाडकी अभियानात सर्वच घटकांनी सातत्याने जागरूक राहून आपली भूमिका बजावल्यास बीड जिल्ह्यासह राज्यातील मुलींचे कमी होणारे चित्र बदलेल. या अभियानांतर्गत गाव पातळीवरील आरोग्य, आहार आणि स्वच्छता यासाठी गठित करण्यात आलेल्या सदस्यांनी प्रभावी भूमिका बजावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. गावपातळीवर कृतिशील भूमिका घेऊन सजगपणे गावातील वातावरण मुलींच्या जन्माचे स्वागत करणारे आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोषक केले जाणार आहे. बीडमध्ये दर हजारी पुरुषांमागे ८०७ मुलींचा जन्मदर आहे. त्यापाठोपाठ जळगाव, नगरसह दहा जिल्ह्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. सध्या नगर जिल्ह्यातील स्त्रियांचा जन्मदर ८५२ इतका आहे.
मंडळाच्या प्रवर्तक अॅड. वर्षा देशपांडे यांनी लेक लाडकी अभियानाचा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रातील प्रत्येकी जणांना प्रशिक्षित केले जाईल. जिल्ह्यातील २८८ जणांना स्त्री जन्मदर वाढवण्यासाठी काय करायचे, याचे प्रशिक्षण मिळेल.

हजार पुरुषांमागे अत्यल्प स्त्री जन्मदर असलेले जिल्हे

- बीड : ८०७ जळगाव : ८४२ नगर : ८५२ बुलढाणा : ८५५ औरंगाबाद : ८५८ वाशिम : ८६३ कोल्हापूर : ८६३ उस्मानाबाद : ८६७ सांगली : ८६७ जालना : ८७०

हे उपक्रम राबवणार...

ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात ते वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या संख्येचा फलक लावणे, दरमहा त्याचा आढावा घेऊन तारखेला बदल करणे, वर्षभरात जन्माला आलेल्या मुलींचा तिच्या आईचा कपडे देऊन गौरव करणे, गावातील तरुण मुला-मुलींचे सर्वेक्षण करून त्यांची युवा संसद भरवून जागृती करणे, गरोदर मातांना शुभेच्छा देऊन गर्भलिंग निदान करण्याबाबत माहिती देणे, नवविवाहितांना गर्भलिंग निदान करण्याची शपथ देणे, सासू-सुनांचा मेळावा आदी उपक्रम या अभियानांतर्गत राबवले जाणार आहेत.

१४ एप्रिलपासून प्रशिक्षण

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहायकांना १४ ते १६ एप्रिल या कालावधीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर हे अधिकारी कर्मचारी गाव पातळीवर या अभियानासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. डॉ.संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी.

राज्यात राबवू अभियान

आम्ही राज्यभरात लेक लाडकी अभियान हाती घेतले आहे. बीडमध्ये आम्ही हे अभियान यशस्वीपणे राबवले. शासनानेही आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यानुसार आम्ही आरोग्य, एकात्मिक बालविकास, महिला बालकल्याण विभागाच्या सहकार्याने ही मोहीम नगर जिल्ह्यातही राबवत आहोत. अॅड.वर्षा देशपांडे, प्रवर्तक, लेक लाडकी अभियान.