आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास : नगर ते पुणे रेल्वेचे अंतर हंोणार दोन तास - दिलीप गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-पुणे रेल्वेमार्गावर काष्टी-पाटस-केडगाव-पुणे अशी कॉड लाइन टाकण्याबाबत केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी अधिका-यांना दिल्याने लवकरच हा मार्ग तयार होऊन नगर-पुणे रेल्वेचे अंतर फक्त दोन तासांचे होईल, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी शुक्रवारी (4 जुलै) पत्रकार परिषदेत दिली.
नगर जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत रेल्वेमंत्री गौडा व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुनीलकुमार सुध यांच्याशी चर्चा करून यांच्याशी भेट घेऊन पाठपुरावा केला, अशी माहितीही त्यांनी दिली. पुढील पाच वर्षांत या प्रश्नांबरोबरच जिल्ह्यातील उद्योग, पाणी, कँटोन्मेंट भागातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे यांवर भर देणार असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले. कल्याण-विशाखापट्टणम् महामार्ग केंद्र सरकारच्या चारशे कोटींच्या निधीतून रुंद होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी भाजपचे राष्ट्र ीय सचिव श्याम जाजू, शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, मधुसूदन मुळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

कँटोन्मेंट भागातील नागरिक लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान करतात. मात्र, त्यांना केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ मिळत नाही. हा लाभ त्यांना मिळवून
देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘गोल्डन कॉरिडॉर’मध्ये नगरचा समावेशासाठी प्रयत्न
नगरमध्ये उद्योगधंदे आल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही. त्यामुळे उद्योगधंदे वाढवण्यासाठी मुंबई-दिल्ली ‘गोल्डन कॉरिडॉर’मध्ये नगरचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गांधी यांनी सांगितले. तसे झाल्यास येथील तरुणांना नोकरीसाठी नगरच्या बाहेर जावे लागणार नाही, असे ते म्हणाले.

वाहून जाणारे पाणी अडवणार
नगर जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांवरून पडणारे 80 टीएमसी पाणी कोकणात वाहून जाते. फक्त 40 टीएमसी पाणीच वापरले जाते. वाहून जाणारे पाणी अडवून वापरण्यासाठी नगरपासून थेट परभणीपर्यंतचे सर्व खासदार एकत्र येऊन प्रयत्न करत असल्याची माहितीही गांधी यांनी दिली. त्यासाठी नद्याजोड प्रकल्प राबवण्याचाही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न
- दौंड-मनमाड लाइन दुहेरीकरण व सर्व्हे,
- नगर-बीड-परळीसाठी बजेटमध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव.
- नगर-माळशेज-कल्याण रेल्वे लाइन सर्व्हे करून मंजुरी देणे.
- पुणे-केडगाव-काष्टी-नगर-काष्टी-पाटस-केडगाव-पुणे ही नवीन कॉड लाइन टाकण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे नगर ते पुणे रेल्वे अवघ्या दोन तास शटल सेवा सुरू करता येईल.
- नाशिक कुंभमेळ्यासाठी शनिशिंगणापूर येथे रेल बुग काउंटर सुरू करणे.
- सोलापूर-नगर-मनमाड-नाशिक दरम्यान विशेष रेल्वे सुरू करणे.
- नगर स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्र. 2 विंडो/पार्किंग/केटरिंग पिण्याचे पाणी व्यवस्था करणे.
- नगर रेल्वे स्टेशनजवळ खुल्या जागेवर शॉपिंग हॉल व आधुनिक हॉस्पिटलसाठी प्रयत्न.
- शिर्डी-पंढरपूरला जाणारी शिर्डी पॅसेंजर, राहुरी, बेलवंडी व श्रीगोंदे येथे थांबा मिळण्याबाबत.
- रेल्वे लाइनच्या खालून अंडर ग्राउंड वीज वाहून नेण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. त्यासाठी पाठपुरावा.
- नगरवरून जाणा-या रेल्वे साप्ताहिक रेल्वे रोज सुरू करण्यासाठी प्रयत्न.
- कोल्हापूर-गोंदिया दरम्यान जाणा-या महाराष्ट्र एक्स्प्रेसला एससी डबे नाहीत, त्या गाडीला 2 टायर एसी, 3 टायर एसी डबे लावण्यासंदर्भात प्रयत्न.
- शिर्डी-मुंबई गाडी ही सात डब्यांची आहे. शिर्डीला येणा-या भाविक पर्यटकांची संख्या लक्षात घेता या गाडीस 22 डबे मंजुरीसाठी प्रयत्न.
- 1992 पासून भूसंपादनाअभावी प्रलंबित असलेला बेलापूर-नेवासे-शेवगाव-बीड-परळी लाइन मंजुरीसाठी प्रयत्न.