आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New Technology Employe Except Says Nagar Collector Sanjivkumar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवे बदल कर्मचार्‍यांनी स्वीकारावेत : जिल्हाधिकारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नवीन तंत्रज्ञानामुळे होणारे आधुनिक बदल आत्मसात करुन कर्मचार्‍यांनी स्वत:च्या कामात बदल करण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी केले. महसूल दिनानिमित्त सहकार सभागृहात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात उल्लेखनीय काम केलेले महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार करताना ते बोलत होते.

कार्यक्रमास पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव आदी उपस्थित होते. देशात गेल्या पंचवीस वर्षांत खूप बदल झाले आहेत. यापुढे या बदलांना अधिक गती येणार आहे. या बदलांसोबत स्वत:ला बदलावे लागेल. कोणत्याही कामाला नकार न देता काम करावे, असे आवाहन करुन डॉ. संजीवकुमार यांनी नियोजनाला महत्त्व देऊन सर्वांशी साधकबाधक चर्चा करुन योग्य निर्णय घेऊन काम केल्यास त्यामध्ये यश मिळते, असे सांगितले.

महसूल विभागाचे काम जमीनविषयक व महसूल गोळा करणे एवढय़ापुरते र्मयादित नाही, तर या विभागाचा विविध विभागांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येतो. टंचाई परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले आहे. यापुढे लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अधिकार्‍यांचे काम केल्यास कोणत्याही प्रसंगाला सर्मथपणे सामोरे जाता येईल, असे पोलिस अधीक्षक शिंदे यांनी सांगितले.