आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेवासा येथे लंघे यांच्या पक्षबदलाने विरोधकांसमोर अडचणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासा: तालुक्यात गडाख यांना असणारे कट्टर विरोधक भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने यंदाची निवडणूक विरोधकांसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी गट एकतर्फी विजय मिळवण्यास उत्सुक आहेत.
आमदार शंकरराव गडाख यांच्या विजयानंतर तालुक्यात असणारे एकमेव विरोधक भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने गडाख यांना तालुक्यात तगडा विरोधक राहिलेला नाही. यामुळे सर्व गडाख विरोधकांनी पक्षीय नीती बाजूला ठेवत महाआघाडीबाबत विचार चालू आहे. याबाबत प्राथमिक बैठका झाल्या असल्या तरी अद्यापि निर्णय झालेला नाही.
बेल पिंपळगाव गटात नेहमी प्रस्थापितांच्या विरोधात मतदान करणारा गट म्हणून ओळखला जातो. यामुळे या गटात सत्ताधार्‍यांसमोर अडचण येण्याची शक्यता आहे. घुले-गडाख यांच्या विरोधात या गटाने पहिल्यापासून भूमिका घेतली आहे. लंघे यांचा बालेकिल्ला म्हणून हा गट ओळखला जातो. दोन्ही विधानसभेच्या मतदानाच्या आकडेवारीवरून हे अधोरेखित झाले आहे. मात्र, आता लंघे गडाख यांच्या गटात सहभागी झाल्याने या गटातील विरोध संपल्यासारखाच आहे. या गटातून लंघे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दिगंबर शिंदे व अशोक शेळके हे दोघेही येथूनच उमेदवारीसाठी प्रय}शील आहेत. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ शेळके हेही रिंगणात उतरणार आहेत. सर्व विरोधक एक झाल्यास लंघे यांच्याविरोधात एकच उमेदवार असेल, त्यावेळी लंघे यांच्यासमोर अडचणी येण्याची शक्यता आहे.
गडाख, घुले, लंघे व मुरकुटे हे चारही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कार्यकर्ते पंचायत समितीसाठी आपल्या उमेदवारास संधी मिळावी, यासाठी प्रय}शिल आहेत. भेंडा, चांदा व कुकाणा येथेही घुले, गडाख व विखे यांचा प्रभाव आहे. चांदा गटात विद्यमान सदस्या विजयाताई अंबाडे तर, भेंडा गटात दिलीप सरोदे यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रय} सुरू आहेत.
मात्र, लंघे यांच्या कार्यकर्त्यांमुळे सत्ताधार्‍यांपुढेही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कुकाणा गट राखीव झाल्याने कोणाला उमेदवारी द्यावी, असा प्रश्न नेत्यांपुढे आहे. नेवासा गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने सत्ताधार्‍यांकडून शंकर लोखंडे यांचे नाव आघाडीवर आहे.
याशिवाय विद्यमाने सरपंच नंदकुमार पाटीलही स्पर्धेत आहेत. सोनई व घोडेगाव गटांत गडाख यांचा वरचष्मा आहे. पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारणसाठी खुले असल्याने सोनई, पाचेगाव व शिरसगाव या गणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोनई गणातील उमेदवार सभापती होणार असल्याचे मानले जात आहे.
मात्र, लंघे यांच्यासारखा विरोधक नसल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.