आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खर्डा येथे सापडलेले अर्भक स्नेहालयात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड - तालुक्यातील खर्डा येथे दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या नवजात अर्भकास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी नगरच्या स्नेहालय संस्थेत दाखल केले. या मुलाचे ओठ तुटलेले होते. विक्रम पवार विकास सकट यांनी १०८ रुग्णवाहिकेचे चालक अनिकेत गोलेकर डाॅ. संजय ठाकरे यांना या अर्भकाबाबत कळवल्यानंतर त्यांनी त्यास जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले.
वैद्यकीय अधिकारी डाॅ. युवराज खराडे यांनी त्याची तपासणी केली. सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांनी या मुलाच्या पुढील संगोपनाच्या दृष्टीने स्नेहालयात या मुलास दाखल करण्याचा निर्णय घेतला. याकामी त्यांनी आपले मित्र गणेश भळगट, संतोष भनगडे, दादा हगवणे यांना बरोबर घेऊन रविवारी नगर येथे स्नेहालय संस्थेत या मुलास दाखल केले.