आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक पाटील खूनप्रकरणाच्या फेरतपासाचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अभियांत्रिकीमहाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक दादालाल पाटील (वय २१) याच्या खूनप्रकरणाच्या तपासावर नागपूर रेल्वे विभागाच्या पोलिस अधीक्षकांनी लक्ष ठेवावे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे के. के. सोनवणे यांच्या खंडपीठाने मंगळवारी हे आदेश दिले.

प्रतीक पाटील (नगर) हा कोपरगावच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता. नगर-मनमाड रेल्वेमार्गावर कोपरगावजवळ ऑक्टोबर २०१० रोजी त्याचा मृतदेह आढळला होता. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून या गुन्ह्याचा तपास बंद केल्याचा अहवाल न्यायालयाला दिला. मात्र, प्रतीकचे वडील दादालाल पाटील यांनी मनमाडच्या प्रथमवर्ग न्यायालयात याप्रकरणी खासगी फिर्याद दाखल केली होती.

प्रतीकच्या मृतदेहावरुन गरीब रथ एक्स्प्रेस गेली होती. या रेल्वेचालकाची साक्ष नोंदवण्यात आली. रेल्वे जाण्यापूर्वी रुळावर मृतदेह पडलेला असल्याचे त्यांनी साक्षीत सांगितले. त्यानुसार या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आला. रेल्वे पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक आर. डी. चोपडे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपी निष्पन्न होत नसल्याने वर्ग अहवाल दिला होता. त्यावर फिर्यादी पाटील यांनी आक्षेप घेतला.

या गुन्ह्याचा तपास केंद्रीय सीआयडी किंवा सीबीआयमार्फत करावा, यासाठी दादालाल पाटील यांनी अॅड. नारायण नरवडे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. त्यांनी तपासातील त्रुटी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर न्यायालयाने या प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेच्या नागपूर विभागाच्या पोलिस अधीक्षकांना तपासावर देखरेख ठेवण्याचे आदेशात नमूद केले आहे.
बातम्या आणखी आहेत...