आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी येथील पीडित कुटुंबाला जनशक्ती संघटनेची सांत्वनपर भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कर्जतच्या ठाणेदारांची भेट घेऊन जनशक्ती संघटनेने केली आहे. पिडीत कुंटुबाचे सांत्वन केले.अत्याचार हत्याकांडामुळे कोपर्डी गावात दहशदीचे वातावरण आहे.
कोपर्डी गावातील वस्तुस्थिती जाणून घेतली असता त्याठिकाणी पिडीत कुटुंब त्या मुलीची आईचे सांत्वन केले असता माझ्या मुलीसोबत जी घटना घडली ती घटना कोणाच्याही मुलीशी, कुटुंबाशी घडू नये जसे हाल माझ्या मुलीचे केले तसेच हाल त्या नराधमांचे करावे, ही घटना पिडीत कुटुंबाच्या तोंडून ऐकत असतांना सर्वाचे डोळे भरुन आले होते.एवढ्या प्रखर वेदना त्या माऊलीच्या बोलण्यातून जाणवत होत्या,तर वडील काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मृत मुलीची मोठी बहीण आणि भाऊ सुुद्धा हतबल निराश जाणवत होते. कोपर्डी गावातील नागरिकांशी पिडीत कुटुंबांच्या शेजारी असणाऱ्या कुटुंबाकडे विचारपूस केली असता ती होतकरू, गुणवान मुलगी असल्याचे सांगत होते. कोपर्डी गावात पोलिस बंदोबस्त असून, अनेक नेत्यांना गावात प्रवेश बंदी आहे.

या प्रकरणामुळे गावकरी सुद्धा संतापल्याचे वातावरण आहे. कोपर्डी येथील पिडीत कुंटुबांला मदतीचा हात देणारा होतकरू युवक शाम सावळे या युवकांवर जनशक्ती संघटनेची युवा आघाडी तालुकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी पिडीत कुंटुबांला लागणारी मदत करण्यासाठी जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासाठी निवड केली.या वेळी जनशक्ती संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी या कुंटुबांला जो पर्यत न्याय मिळणार नाही तो पर्यत त्या कुंटुबाला समर्थ साथ देऊ कायद्याने जरी आरोपींना शिक्षा कमी झाली.तरी भर चौकात जनशक्ती संघटना त्या दोषी नराधमाना फाशीची शिक्षा देईल जसे त्या मुलींचे हाल केले तसेच हाल करून कायद्याच्या विरोधात जाऊन का होईना त्या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा देऊ अशा प्रकारे त्या पिडीत कुटुंबांचे दपु:ख हलके केले.यावेळी जनशक्ती संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत ढोरे, सोशल मिडीया जिल्हाअध्यक्ष राजू लोंखडे,प्रवक्ते गणेश धुंदळे पाटील,युवा आघाडी तालुकाध्यक्ष अमोल व्यवहारे,युवा आघाडी शहरध्यक्ष स्वप्निल वायाळ,प्रमोद सावळे,यांच्यासह स्थानिक संभाजी बिग्रेेड पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...