आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोकुळाष्टमीसह स्वातंत्र्यदिनी डीजेंचा दणदणाट थंडावणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नगर - ध्वनिप्रदूषण नियमाचा सोयीनुसार अर्थ लावून पोलिसांकडून ध्वनिक्षेपक व्यावसायिकांवर होत असलेल्या कारवायांविरोधात साउंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर व्यासायिकांनी एकीची वज्रमुठ बांधली आहे. कारवायांविरोधात साउंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशन बेमुदत संपावर जाणार असल्याने गोकुळाष्टमीसह स्वातंत्र्यदिनी डीजेंचा दणदणाट थंडावणार आहे. 
 
सार्वजनिक उत्सवात मोठ्या प्रमाणात डिजेंचा वापर करून जल्लोष साजरा केला जातो. वर्षभरात येणारे विविध सण उत्सवात डीजेंचा आवाज घुमत असतो. पण ध्वनिप्रदूषण नियमानुसार आैद्योगिक, वाणिज्यिक, निवासी शांतता क्षेत्र अशा विभागात चाळीस ते पंचाहत्तर डेसिबलपर्यंत मर्यादा घालण्यात आली आहे. शहरात ध्वनिक्षेपक लावता रस्त्यांवर ७५ ते ८० डेसिबलपर्यंतची मर्यादा घालण्यात आली आहे. घरातील पंख्याचा आवाज ४५ ते ५० डेसिबल असून मानवी बोलण्याचा आवाजही ५५ डेसिबलपर्यंत असू शकतो. जनसमुदायाचा आवाज ७५ डेसिबलपेक्षा अदिक असतो. त्यामुळे हा नियम कालबाह्य झाला आहे. 
 
पोलिस मोजत असलेल्या डेसिबलविषयी मनात शंका आहे. त्यामुळे हा ध्वन कसा किती अंतरावर कोठे कोणत्याप्रकारे मोजायचा हे स्पष्ट करण्यात आले नाही. असे असतानाही ध्वनिक्षेपकांवर कारवाई केली जाते. या कारवाईला आयाेजकांनी विरोध केल्यास पोलिसांकडून ध्वनिक्षेपकावर काठ्या आपटणे, गुन्हे दाखल करणे आदी कारवाया केल्या जातात. त्यामुळे संतप्त व्यावसायिकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 
बातम्या आणखी आहेत...