आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेहेराझादजवळ बिबट्या जेरबंद, वन विभागाकडून ट्रँक्विलाईझ गनचा वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगरपासून दहा किलोमीटर अंतरावर मेहेराझाद येथे पकडलेला बिबट्या. - Divya Marathi
नगरपासून दहा किलोमीटर अंतरावर मेहेराझाद येथे पकडलेला बिबट्या.
नगर- कआठवड्यापासून विळद परिसरात फिरणारा बिबट्या अखेर सोमवारी दुपारी पिंपळगाव माळवी तलावाजवळ मेहेराझाद येथे वन विभागाच्या अिधकाऱ्यांनी बेशुद्ध करून पकडला. हे स्थान नगर शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असल्याने बिबट्या आता नगर शहराच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
हा बिबट्या तीन दिवसांपूर्वी विळद घाटातील विखे फाउंडेशनच्या शैक्षणिक संकुल परिसरात दिसला होता. त्याची खबर मिळाल्यानंतर वनखात्याने तेथे पिंजराही लावला. मात्र, पिंजऱ्याला हुलकावणी देऊन तो केकताई पिंपळगाव माळवी वनक्षेत्रातून मेहेराझाद येथे गेला. रविवारी सायंकाळी तो या परिसरात आला. अवतार मेहेरबाबा ट्रस्टची तेथे मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. त्यांनी जमिनीच्या अनेक तुकड्यांना जाळीचे कुंपण केले आहे. त्यापैकी सुमारे दहा एकरांच्या एका तुकड्यात बिबट्या शिरला. बाहेर पडण्यास अतिशय कमी जागा असल्याने बिबट्याच्या ती लक्षात आली नाही. परिणामी तो तेथे अडकून पडला.

रविवारी याबाबतची माहिती समजल्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचे प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले. सोमवारी बिबट्या लपल्याची जागा समजल्यावर वनक्षेत्रपाल रमेश देवखिळे त्यांच्या वीस सहकाऱ्यांच्या ताफ्याने त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु केले.

दरम्यान, त्या परिसरात ग्रामस्थांचे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. बिबट्या लपलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर गवत असल्याने तो लपून बसला होता. अखेर तो कुंपणाच्या जवळ आला तेव्हा देवखिळे यांनी बेशुद्ध करण्याच्या गनमधून (ट्रँक्विलाईझ गन) त्याला बेशुद्ध करण्याचे औषध असलेला बाण मारला. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आले.