आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅशलेस व्यवहारात 30 टक्के वाढ, स्वाइप मशीनच्या तुटवड्यामुळे बहुतांशी व्यवहार अजूनही रोखीनेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नोटबंदीनंतर नगर शहर जिल्ह्यात कॅशलेसच्या व्यवहारांमध्ये सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली अाहे कॅशलेसद्वारे व्यवहार वाढले असले तरी जिल्ह्यात स्वाइप मशीनचा तुटवडा मात्र अद्याप कायम आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेतील बहुतांशी व्यवहार हे रोख चलनाद्वारेच होत आहेत. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबरला पाचशे हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. नोटाबंदीच्या निर्णयाला ३० डिसेंबरला ५० दिवस पूर्ण झाले. नोटाबंदीच्या निर्णयाचा बँकिंग क्षेत्राबरोबरच व्यापार, उद्योग, व्यवसाय, सराफ बाजारासह अन्य क्षेत्रावर मोठा परिणाम झाला होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दुसऱ्या दिवसापासून जुन्या हजार पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांच्या राष्ट्रीयीकृत खासगी बँका पोस्ट कार्यालयात रांगा लागल्या होत्या. नोटबंदीनंतर सर्व बँकांत शनिवारपर्यंत (३१ डिसेंबर) २१०० कोटी रुपयांचे चलन जमा झाले होते, तर ४२५ कोटींच्या हजार पाचशे रुपयांच्या नोटा बदलून देण्यात नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर बँकांचे व्यवहार शंभर टक्के सुरळीत झाले नाहीत. 

केंद्र सरकारने हजार पाचशे रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी शुक्रवार (३० डिसेंबर) ही अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर ३१ मार्चनंतर केवळ रिझर्व्ह बँकेतच नोटा स्वीकारल्या जाणार अाहेत. मात्र, त्यासाठी शपथपत्र दिले बंधनकारक असणार आहे. शेवटची मुदत असल्यामुळे शुक्रवारी सकाळपासून बँकांत ग्राहकांनी गर्दी सुरू केली होती. जीपीआे चौक येथील भारतीय स्टेट बँकेत शुक्रवारी सकाळपासून ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. बँक सुरू होण्यापूर्वीच अनेक ग्राहक बँकेसमाेर होते. शहरातील अन्य राष्ट्रीयीकृत बँकांतही गर्दी कायम होती. राष्ट्रीयकृत बँकांत गर्दी असली, तरी खासगी बँका मात्र आेस पडलेल्या दिसत होत्या. ज्या बँकांत गर्दी होती, तेथे अर्धा ते एक तास असा कालावधी पैसे भरण्यासाठी लागत होता. दरम्यान, बँकेत पैसे आहेत, पण पैसे काढण्यावर मर्यादा घातली आहे. पैसे काढले तरी त्याही दोन हजार पाचशे रुपयांच्या नव्या नोटा आहेत, त्यामुळे सुट्यांचे वांधे कायम असल्याने अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. अनेक बँकांत पाचशे रुपयांच्या नव्या नोटा आला असल्या, तरी बँकांत एका ग्राहकाला पाचशे रुपयांच्या चार किंवा पाच नोटा दिल्या जात आहेत. एकीकडे सरकार व्यावसायिकांना कॅशलेसद्वारे व्यवहार करण्याचे आवाहन करत आहे. मात्र, कॅशलेश व्यवहार करण्यासाठी व्यावसायिकांना लागणाऱ्या स्वाईप मशीनचा सध्या तुटवडा असल्याने बहुतांशी व्यवहार हे रोख रक्कमेद्वारे होत आहेत. नगर जिल्ह्यात ३० टक्के व्यवहा हे कॅशलेशद्वारे होत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...