आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन ट्रकमधील 42 टन तूर नगरला जप्त, पाेेलिसांची कारवाई, ‘नाफेड’कडून चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - साठा करून ठेवलेली तूर विक्रीसाठी घेऊन जात असल्याच्या संशयावरून नगरमध्ये दोन ट्रकमधील तब्बल ४२ टन तूर जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री नगर-मनमाड रस्त्यावर ही कारवाई केली.  
 
दरम्यान, ही तूर ही पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीची असून, चार ट्रकद्वारे ती भोसरी येथील गोदामांत ठेवण्यासाठी गेली होती. चारपैकी दोन ट्रक पोहोच झाले. मात्र, अन्य दोन ट्रक पोहोच झाले नाहीत. हे ट्रक विष्णू ढाकणे यांनी चार दिवस लपवून ठेवल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक प्रताप ढाकणे यांनी केला आहे.
 
तुरीचा साठा विक्रीसाठी नेली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे व सहकाऱ्यांनी मनमाड रस्त्यावर छापा टाकून दोन ट्रक ताब्यात घेतले. त्यात तब्बल ४२ टन तूर आढळली. ट्रकचालकांना याबद्दल ठोस माहिती सांगता न आल्यामुळे ही वाहने एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेऊन लावण्यात आली.  चाैकशीत या ट्रकचालकांनी दोन-तीन व्यापाऱ्यांची नावे सांगितली आहेत.  ही तूर पाथर्डी बाजार समितीतून खरेदी केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी तहसीलदार, पुरवठा विभाग, पाथर्डी बाजार समितीसह नाफेडच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले हाेते.
 
जप्त तुरीच्या पाेत्यांचे बारदाने सरकारी
पोलिसांनी जप्त केलेली तूर बाजार समितीतून आणली नसल्याचे ट्रकचालक प्राथमिक चौकशीत सांगत आहेत. ही तूर दोन-तीन गावांतील व्यक्तींनी खरेदी केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, हे व्यापारी कोण आहेत, याबद्दल पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे. तुरीचा बारदाना मात्र शासकीय असल्याचे पोलिस सांगत आहेत.  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...