आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीनंतरही शोधला समृद्ध शेतीचा मंत्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्धवराव कराळे यांच्या पेरूबागेची पाहणी करतान ‘आत्मा’चे रावसाहेब बेंद्रे, संभाजी गायकवाड, सतीश बारस्कर, प्रवीण गोरे आदी. - Divya Marathi
उद्धवराव कराळे यांच्या पेरूबागेची पाहणी करतान ‘आत्मा’चे रावसाहेब बेंद्रे, संभाजी गायकवाड, सतीश बारस्कर, प्रवीण गोरे आदी.
नगर - वयवर्षे ७६, परंतु एखाद्या तरुणाला लाजवेल असे नवनवीन प्रयोग करून वार्षिक आठ ते दहा लाखांपर्यंत उत्पन्न उद्धवराव त्र्यंबकराव कराळे (ढवण वस्ती, तपोवन रस्ता, सावेडी) मिळवत आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतरही शेतीशी नाळ तुटू देता ते कोकणाप्रमाणे नारळ, आंबा, पेरू, संत्रा, चिकू, जांभूळ, अंजीर अशा पिकांतून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. त्याचबरोबर अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या उन्नतीलाही हातभार लावत आहेत. 
 
सध्या तरुणाचा कल खासगी का असेना, परंतु नोकरीकडे अाहे. शेती हा अनिश्चिततेचा व्यवसाय आहे. पण असे असले तरी राज्यासह देशातील ७० लोकांचा उदरनिर्वाह शेतीशी निगडित आहे. शेतात नवनवीन प्रयोग राबवून उत्पन्न वाढवल्यास स्थैर्य चांगले उत्पन्न मिळू शकते, हे उद्धवराव कराळे या सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याने सिद्ध करून दाखवले. त्यांनी आपल्या अकरा एकर शिवाराला शेतीची प्रयोगशाळाच केली आहे. आपल्याकडे सहसा येणाऱ्या वाणांची लागवड त्यांनी केली आहे. अकरा एकरांसाठी ७५ फूट खोल ३५ फूट व्यास असलेल्या विहिरीचे पाणी पुरते. यातून ते नवनवीन प्रयोग राबवतात. त्यांच्या शिवारात सध्या संत्र्याची २००, चिकूची ६०, नारळाची २००, जांभळांची १००, पेरूची १५० आणि काही सीताफळाची झाडे आहेत. नारळामध्ये आंतरपीक म्हणून मिरी या मसाला पिकाची त्यांनी लागवड केली आहे. पेरूतून त्यांना यावर्षी ७० हजार, संत्र्यांचे तीन ते चार लाख, जांभळातून एक लाख, गहू पिकातून एकरी एक लाख, तसेच चिकू, सीताफळ नारळातून ६० ते ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

ठाणे जिल्ह्यातील बाहडोली वाणाच्या जांभळाची कराळे यांनी यशस्वी लागवड केली. अलाहाबाद सफेदा नावाचे पेरूच्या वाणाने त्यांना यावर्षी चांगला अाधार दिला. वय झाले असतानाही जातीने ते शेतीकडे लक्ष देतात. जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी असलेल्या पत्नी ताराबाई यांचे त्यांना मोलाचे सहकार्य मिळते. दरवर्षी खर्च वजा जाता सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. 

कराळे यांनी गेल्या वर्षी कुदरत १७ या गव्हाच्या वाणाची पेरणी केली होती. यावर्षी त्यांचे कुदरत २१ हे वाण जोमात असून ते कापणीला आले आहे. यातून त्यांना सुमारे दीड लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आह. गतवर्षी त्यांनी कुदरत वाणाची पाच हजार रुपये क्विंटलने विक्री केली. जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांकडून या बियाणाला मागणी असते. दररोज परिसरातील नागरिक फळ, नारळ आदींसह शेतमाल खरेदीसाठी येत असतात. सेवानिवृत्त आत्मा प्रकल्प उपसंचालक संभाजी गायकवाड यांचे सहकार्य मिळाल्याचे कराळे सांगतात. कराळेंच्या शेतीची पाहणी करण्यासाठी ‘आत्मा’च्या वतीने शिवारफेरी काढण्यात आली. यावेळी ‘आत्मा’चे सेवानिवृत्त प्रकल्प उपसंचालक संभाजी गायकवाड, आत्माचे पणन तज्ज्ञ रावसाहेब बेंद्रे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रवीण गोरे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक कौस्तुभ कराळे, उमेश डोईफोडे, शेतकरी सतीश बारस्कर यांनी पाहणी केली. 
 
पेरणी ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन 
कराळे यांंनी शेतकरी मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. दररोज सुमारे ४-५ आणि वर्षभरात ४०० शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती घेतात. पेरणी ते काढणीपर्यंत कराळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. रोग, किडी त्यावरील उपाय, पेरणीसाठीचे सुधारित वाण आधुनिक तंत्रज्ञान याविषयी कराळे मार्गदर्शन करतात. राज्यात ठिकठिकाणी यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना बोलावून ते त्यांचे अनुभव शेतकऱ्यांना सांगतात. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...