आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशनचे तब्बल दीड कोटींचे अन्नधान्य पडून, 14 तहसील कार्यालयांसमोर 35 मालट्रक उभे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तहसील कार्यालयाच्या गोदामांतील हमालांना मजुरी मिळाल्याने गेल्या मंगळवारपासून (११ जुलै) त्यांनी काम बंद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगर वगळता सर्वच तहसील कार्यालयांच्या गोदामांसमोर अन्नधान्यांनी भरलेले ३५ मालट्रक उभे आहेत. रेशनचे हे धान्य जुलै महिन्याचे असून, त्याची किंमत कोटी ८७ लाख रुपये आहे. मालट्रक जागीच उभे असल्यामुळे अन्नधान्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 
 
गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानांतून अल्प दरात गहू तांदूळ दिला जातो. नगर जिल्ह्यात १० लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारक असून, लाभार्थींची संख्या ४५ लाख आहे. या लाभार्थींना हजार ८०० स्वस्त धान्य दुकानांतून हे अन्नधान्य दिले जाते. जिल्ह्याला दर महिन्याला सुमारे २० कोटींचे लाख ७० हजार ४७५ क्विंटल अन्नधान्य मिळते. लाख ११ हजार क्विंटल गहू ६५ हजार क्विंटल तांदळाचा त्यात समावेश आहे. अगोदर हे अन्नधान्य शासकीय गोदामांत उतरवण्यात येते. त्यानंतर खासगी संस्थांच्या मालट्रकद्वारे ते संबंधित तालुक्यांतील पुरवठा विभागाच्या गोदामांत जाते. 
 
जुलै महिन्यासाठी लाख ७० हजार ४७५ क्विंटल नियतन पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहे. मात्र, ११ जुलैपासून तालुक्यातील गोदामांत अन्नधान्य उतरवून घेणाऱ्या हमालांना मजुरी मिळाल्याने त्यांनी काम बंद केले आहे. या गोदामांत ३२३ मजूर काम करतात. त्यांना हजार रुपये रोज दिला जातो. मात्र, मजुरी मिळाल्याने ३०० हून अधिक मजुरांनी काम बंद केले आहे. खासगी संस्थेमार्फत हमालांना मजुरी देण्यात येते. त्यांनी काम बंद केल्यामुळे पुरवठा विभागांतर्गत असलेल्या तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामांत अन्नधान्य भरून अालेल्या ३५ मालट्रक गेल्या आठ दिवसांपासून उभ्या आहेत. 
 
राहाता तालुक्यातील गोदामांसमोर सर्वाधिक ट्रक उभे आहेत. अकोले ३, संगमनेर ४, कोपरगाव २, श्रीरामपूर ४, राहुरी १, पाथर्डी ३, जामखेड ३, पारनेर २, कर्जत ५, श्रीगोंदे नगर शहर अशी ३५ ट्रकमध्ये हजार क्विंटल अन्नधान्य असून, त्याची किंमत कोटी ८७ लाख रुपये आहे. सध्या पावसाळी वातावरण आहे. पावसाचे पाणी ट्रकवर पडून हे अन्नधान्य खराब होण्याची शक्यता आहे. असे असतानाही आठ दिवसांपासून कोणी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. जिल्हा पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळेच हे अन्नधान्य पडून असून, याबाबत जिल्हा पुरवठा विभागाने संबधित ठेकेदाराला लेखी पत्राद्वारे खुलासा करण्यास सांगितले अाहे. संबंधित ठेकेदाराने जिल्हा पुरवठा विभागाला खुलासा दिला असून, नेमका काय खुलासा आहे हे मात्र अद्यापि स्पष्ट झालेले नाही. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 
 
ठेकेदाराचे तीन कोटी थकले 
अन्नधान्याचे वितरण करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला मागील दोन-तीन महिन्यांपासूनचे देयक मिळालेले नाही. सुमारे तीन कोटींची ही देयके आहेत. देयके मिळाल्याने मजुरांना देण्यासाठी पैसे ठेकेदाराकडे नाहीत. त्यामुळे मजुरांनी हे काम बंद केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोट्यवधींचे अन्नधान्य ट्रकमध्ये पडून असताना जिल्हा पुरवठा विभाग मूग गिळून गप्प बसला आहे.